Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- 1 वाटी चणाडाळ
- अर्धी वाटी साबुदाणा
- 1 वाटी किसलेला गूळ
- 1 वाटी नारळ दूध
- 10-12 काजूचे काप
- 1 मोठा चमचा तूप
Directions
- सर्वप्रथम चणाडाळ धुवून घ्या आणि 4 तासांकरता पाण्यात भिजवत ठेवा.
- आता पाणी काढून टाका व डाळ प्रेशर कुकरमध्ये ठेवा. त्यात दीड कप पाणी टाकून 3 शिट्ट्या होऊ द्यात.
- साबुदाणा धुवून 20 मिनिटांकरता भिजत ठेवा.
- एका कढईत मंद आचेवर तूप गरम करत ठेवा. यात काजू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
- आता एका कढईत शिजवलेली डाळ, नारळाचे दूध, साबुदाणा, गूळ टाका. छान एकत्र करा आणि 20 मिनिटांसाठी शिजू द्यात.
- साबुदाणा चांगला शिजल्यानंतर गॅस बंद करा. तळलेल्या काजूने सजावट करा आणि गरमागरम सर्व्ह करा.