Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- बारीक चिरलेला कोबी - 100 ग्रॅम
- बारीक चिरलेला कांदा -1
- बारीक चिरलेली शिमला मिरची - 1
- चिरलेली हिरवी कोथिंबीर - आवडीनुसार
- बेसन - 1 वाटी
- चिरलेल्या हिरव्या मिरच्या - 4 ते 5
- ओवा - 1 टेबलस्पून
- हिंग - अर्धा टेबलस्पून
- दही - अर्धी वाटी
- हळद - अर्धा टीस्पून
- मीठ - 1 टीस्पून
- तेल - आवश्यकतेनुसार
- सोडा किंवा इनो पावडर - चिमूटभर
Directions
- तेल सोडून सर्व साहित्य एकत्र मिसळा. त्यात थोडंसं पाणी घाला. कांदा आणि कोबी घातलेला असल्यामुळे त्याला पाणी सुटते.
- चिमूटभर सोडा किंवा इनो पावडर या मिश्रणात टाका.
- अप्पे स्टँडच्या साच्याला तेलाने ब्रश करा. प्रत्येक साच्यात एक टेबलस्पून पीठ घाला.
- आवश्यकतेपेक्षा जास्त पीठ घालू नका नाहीतर मिश्रण जास्त शिजून अप्पे साच्यातून बाहेर पडू शकते.
- मंद ते उच्च आचेवर 5 ते 7 मिनिटे शिजवा. साच्यातून एक एक करून अप्पे काढा.
- नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.