केसांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवण्यासाठी हेअर स्पा करण्याचा सल्ला दिला जातो. काही जण 3 किंवा 6 महिन्याच्या गॅपने हेअर स्पा करून घेतात. नियमित हेअर स्पा केल्याने केसांच्या तक्रारी कमी होतात. जसेजसे हवामान बदलत जाते तसेतसे आरोग्यासह केसांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे अनेक महिलांना हा प्रश्न पडतो की, थंडीत हेअर स्पा करावा की नाही. थंडीतील वातावरणामुळे केसांमधील कोरडेपणा वाढल्याने केसांच्या तक्रारी वाढतात. मग अशा परिस्थितीत हेअर स्पा करणे योग्य आहे का, जाणून घेऊयात
थंडीत हेअर स्पा घ्यावा की नाही –
थंडीच्या दिवसात केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही हेअर स्पा करू शकता. हेअर स्पामुळे केस मऊ होतात आणि केसांना चमक येते. या दिवसात केसांना हेअर स्पा केल्याने डिप कंडीशनिंग मिळते. फक्त हेअर स्पा करताना जास्त गरम करणे टाळा. याव्यतिरीक्त योग्य स्टायलिस्ट निवडावा, जेणेकरून तुमच्या केसांवर योग्य ट्रिटमेंट होईल. हेअर स्पा करताना तुमच्या केसांच्या काही तक्रारी असतील किंवा एखादे प्रॉडक्टची एलर्जी असेल तर आधीच सांगावे, जेणेकरून केसांचे नुकसान होणार नाही. याशिवाय हेअर स्पा करण्यासाठी केसांना नीट मसाज करावा, जेणेकरून केसांना पोषण मिळते. ज्यामुळे स्काल्प निरोगी राहील.
हेअर स्पा केल्यानंतर केस झाकून ठेवा आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
हेअर स्पा करण्याचे फायदे –
हेअर स्पा केल्यानंतर केसांचे आरोग्य निरोगी राहते. अनेकांना आजकालच्या बिझी लाइफस्टाइलच्या रूटीनमुळे केसांची योग्य काळजी घेता येत नाही. अशा वेळी तुम्ही काही महिन्यांच्या गॅपने हेअर स्पा करणे फायदेशीर ठरेल.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde