Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीFashionHairstyle Tips for saree - साडीनुसार करा हेअरस्टाइल

Hairstyle Tips for saree – साडीनुसार करा हेअरस्टाइल

Subscribe

साडी हा एक पारंपारिक भारतीय पेहराव आहे. स्त्रियांनी कितीही पाश्चात्य संस्कृती आपलीशी केली तरी आजही कोणत्याही सणासाठी किंवा कार्यक्रमासाठी स्त्रिया साडीलाच प्राधान्य देतात. स्त्रिचे सौंदर्य साडीतच खुलते. त्यामुळे स्त्रिया साडीवर मॅचिंग दागिन्यांपासून ते अगदी हेअरस्टाइल पर्यत सर्व तयारी करतात. पण, अनेकदा साडीनूसार योग्य हेअरस्टाइल न केल्याने साडीचा संपूर्ण लूकच बदलून जातो.

साडीवर योग्य हेअरस्टाइल निवडताना साडीची स्टाइल, रंग, आणि प्रकार विचारात घ्यावा लागतो. त्यामुळेच जाणून घेऊयात, कोणत्या साडीनूसार कोणती हेअरस्टाइल करावी.

कांजीवरम साडी –

जर तुम्ही कांजीवरम साडी नेसत असाल तर यावर, जुडा (बन) बांधायला हवा. कांजीवरम साडीवर जुडा हे कॅाम्बिनेशन क्लासिक लुकसाठी उत्तम आहे. जुडाशिवाय तुम्ही वेणी सुद्धा बांधू शकता. वेणीसोबत गजरा याने तुम्हाला मस्त पारंपारीक लुक मिळेल.

नऊवारी साडी –

नऊवारी साडी नेसत असाल तर यावर बन खूप चांगला दिसतो आणि जर आकर्षक लुक करायचा ओपन हेयर चांगले दिसतील. नऊवारी साडीवर अंबाडा बांधून त्यावर गजरा किंवा गुलाब सूद्धा माळू शकता.

पैठणी साडी –

आपल्याकडे पैठणी साडीकडे पारंपारिक साडी म्हणून पाहिले जाते. या साडी वर तुम्ही केस मोकळे देखील सोडून खालून थोडे कर्ली करून घेऊ शकता. पैठणी साडी त्यावर मोकळे केस दागिने म्हणून मोत्याचा सेट किंवा ठूशी. हा लूक परफेक्ट असेल.

डिझायनर साडी –

डिझायनर साडीसोबत फिशटेल वेणी ही बेस्ट हेअरस्टाइल असेल. जर तुमच्या केसांचा वॅाल्यूम जाड असेल तर डिझायनर साडीवर तुम्ही फिशटेल वेणीच बांधायला हवा. एखाद्या फंक्शनसाठी हा लूक परफेक्ट असेल.

 

 

 

हेही पाहा :

Edited By – Chaitali Shinde

Manini