Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthमुलांमध्ये व्हिटामिन 'डी' वाढण्यासाठी काय कराल..

मुलांमध्ये व्हिटामिन ‘डी’ वाढण्यासाठी काय कराल..

Subscribe

व्हिटॅमिन ‘डी’ला ‘सनशाईन व्हिटॅमिन‘असेही म्हणतात. हे चरबी-विरघळणारे जीवनसत्व केवळ हाडांच्या मजबुतीसाठीच महत्त्वाचे नाही, तर हार्मोनच्या स्वरूपात मदत करते.हाडे आणि स्नायू मटॅमिन ‘डी’ हे मुलांमध्ये सामर्थ्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. जी हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात . मुलांच्या आरोग्याच्या विकासासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. संतुलित आहारामुळे मुलांचा शारीरिक विकास, मानसिक विकास आणि प्रतिकारशक्ती ही वाढत असते. इतर जीवनसत्त्वांप्रमाणे, व्हिटॅमिन ‘डी’ आपल्या अन्नपदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध नसते.त्यामुळे पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

Vitamin D Deficiency Symptoms In Children, Treatment, Home Remedies, Problems Like Rickets And Anemia In Children | Vitamin D For Kids: विटामिन डी की कमी से बच्चों में बढ़ जाता है रिकेट्स

- Advertisement -

व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फेट सारख्या आवश्यक खनिजे वाढवते ज्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात.  तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात देखील महत्वाची भूमिका बजावते. द अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, नवजात मुलांसाठी 400 IU व्हिटॅमिन डी आणि मुले व प्रौढांसाठी 600 IU व्हिटॅमिन डी दररोज आवश्यकता असते.जर तुमच्या मुलामध्ये सांधेदुखी, सतत थकवा, केस पातळ होणे, जखमा हळूहळू भरणे इत्यादी लक्षणे दिसत असतील तर ही लक्षणे व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेची लक्षणे आहेत.

व्हिटॅमिन ‘डी’चे स्तोत्र –

- Advertisement -

सूर्यप्रकाशात आपली त्वचा व्हिटॅमिन डी तयार करते. दररोज फक्त 15-20 मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्यानेसुद्धा तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते.

योग्य खाण्याच्या सवयी-

आपल्या आहारात काही फोर्टिफाइड पदार्थ आणि विशेष प्रकारचे मासे खाल्याने व्हिटॅमिन डी मिळवता येते. 

Vitamin D Rich Foods: सप्लीमेंट्स नहीं बल्कि इन चीज़ों से करें विटामिन डी की कमी पूरी - Vitamin D Rich Foods nutritious foods that are high in Vitamin D

व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ –

सुरुवातीसाठी पौष्टिक म्हणून एक ग्लास दूध 

मांसाहार करणार्‍यांसाठी बांगड्यासारखे मासे

शाकाहारींसाठी 1 वाटी मशरूम 

फोर्टिफाइड लस्सी किंवा ताक

2 अंडी 

100 ग्राम पनीर टिक्का

सकाळी किंवा संध्याकाळी 15-20 मिनिटे सूर्यप्रकाश


 

हेही वाचा ;‘या’ उपायाने थांबवा तोंडाला येणारी दुर्गंधीhttps://www.mymahanagar.com/lifestyle/stop-bad-breath-with-this-remedy/677003/

 

- Advertisment -

Manini