Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthसकाळी ब्रेड बिस्कीट खाता ?

सकाळी ब्रेड बिस्कीट खाता ?

Subscribe

पारंपरिक नाश्ता जसे की पोहे , उपमा हे बाजूला सारत हल्ली बहुतेक घरात ब्रेड-बिस्कीटसारखे बेकरी प्रोडक्ट सकाळच्या नाष्टाला पाहायला मिळतात. पण हेच बेकरी प्रोडक्ट कितपत तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत ही विचार करण्याची बाब आहे . अनेक स्त्रिया या नोकरी करणाऱ्या असल्याने अनेक घरात बेकारी प्रोडक्टला प्राधान्य दिल जात. बरेच जणांना बेकरी प्रोडक्ट्स फार आवडतात. मात्र, आवडतात म्हणून त्यांचं सेवन फार प्रमाणात करुन चालणार नाहीय. कारण ते जास्त प्रमाणात किंवा संयम न ठेवता खाल्ल्याने त्यांचा तोटाही होतो.  तसेच आपली एकूण लाईफस्टाईल बिघडून समस्यांना ते थेट मदत करु शकतात. त्यामुळे, त्यांचं जास्त प्रमाणात सेवन करणं टाळलं पाहिजे.

Baked Biscuits Chocolate Bakery Biscuits, Packaging Size: 6*3 Inches, 500 Mg

- Advertisement -

 

वजन वाढणे – रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्याने त्यातील उच्च ग्लायसेमीक इंडेक्स असल्यानेमुळे  तुमचं वजन वाढू शकत.

- Advertisement -

चरबी वाढणे – व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात . ज्याने तुमचं चरबी वाढते.  कोलेस्ट्रॉल – व्हिटॅमिन इ आणि फायबर असलेला ब्रेड अति प्रमाणात खाल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते.  हृदयविकाराचा धोका – सतत रिकाम्या पोटी बेकरी प्रॉडक्ट खाल्याने ह्रदयविकाराचा धोका निर्माण होतो.

What is the difference between white bread and brown/whole grain bread?  Does one make you gain weight while the other helps with weight loss? -  Quora

यकृत – पांढऱ्या ब्रेडमध्ये जास्त प्रमाणात ग्लूटेन असतं . ज्याने तुमच्या यकृताला हानी पोहोचू शकते.

पोट फुगणे – व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर सोडियम असल्याने तुम्हाला पोट सतत फुगलेले जाणवते.

त्यामुळे बेकरी प्रोडक्ट्सचा वापर करताना संयम महत्त्वाचा आहे. अधूनमधून ट्रिट म्हणून त्यांचा आनंद घेणं ठिक आहे.मात्र,सतत आणि अधिक प्रमाणात त्यांचा वापर करणं तोट्याचं ठरु शकतं.


हेही वाचा ;पिझ्झा, बर्गर, मॅगी सतत खाणं लहान मुलांसाठी ठरु शकतं घातकhttps://www.mymahanagar.com/lifestyle/eating-pizza-burger-maggi-can-be-dangerous-for-children/676611/

- Advertisment -

Manini