थंडीचे दिवस सुरु झाले असून अनेक भागात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपण अधिकाधिक हंगामी फळे, भाज्या, गरम आणि पौष्टिक गोष्टींचे सेवन करायला हवे. त्याने थंडीच्या दिवसात व्हायरल इन्फेक्शनचा धोकाही कमी होईल आणि तुम्ही आजारी पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
थंड पेये
फ्रिजमधून कोल्डड्रींक्स किंवा थंड वस्तू पिणे किंवा खाणे टाळले पाहिजे. अन्यथा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन तुम्ही आजारांना आमंत्रण द्याल .
डेअरी प्रोडक्ट
डेअरी प्रोडक्ट घशात म्युकस तयार करतात. ज्याने घशाचा संसर्ग देखील होऊ शकतो. त्यासाठी हिवाळ्यात दूध, शेक आणि स्मूदीसारखे थंड दुग्धजन्य पदार्थ टाळले पाहिजे.
नॉनव्हेज आणि प्रक्रिया केलेले पदार्थ
थंडीत नॉनव्हेजसारखे जड पदार्थ खाणे देखील टाळले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, नॉनव्हेज पचायला जास्त वेळ लागतो, ज्याने शरीरात सुस्ती निर्माण होते तसेच पचनाच्या समस्या वाढून वजन वाढू शकते. थंडीच्या दिवसात कमी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो कारण यामुळे लोकांमध्ये ऍलर्जी होऊ शकते.
ज्यूस आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स
थंडीच्या दिवसात थंड पेये टाळावीत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यूस, कार्बोनेटेड पेये आणि पॅकेज केलेल्या फळांच्या रसांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ताज्या फळांचे सेवन करावे.
जास्त कॅलरीज असणारे पदार्थ
थंडीत गरमागरम चहा, कांदाभजी यांसारखे पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या खाणे टाळणे फायद्याचे आहे.
मिठाई
हिवाळ्यात अनेक सण असतात आणि या दिवसात जास्त प्रमाणात मिठाई खाल्ली जाते. मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे जास्त गोड खाणे टाळले पाहिजे.