Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthथंडीत 'या' चुका टाळा आणि हृदयविकारापासून दूर राहा

थंडीत ‘या’ चुका टाळा आणि हृदयविकारापासून दूर राहा

Subscribe

गरमीच्या तडाख्यापासून सुटका मिळविण्यासाठी प्रत्येक जण थंडीची आतुरतेने वाट पाहात असतो. मात्र, असे असले तरी वाढत्या थंडीमुळे अनेक आजारही डोके वर काढू लागतात. खास करून ज्यांना हृदयाच्या संबधित आजार आहेत, त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. संशोधनानुसार हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, हृदयाचे अनियमित ठोके यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असते. तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा झटका पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळेत येण्याची शक्यता अधिक असते. यावेळी एपिनेफ्रिन, नॉरपेनेफ्रिन आणि कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सची पातळी वाढल्याने ब्लड प्रेशर वाढते आणि शरीरात ऑक्सिजनची समस्या जाणवायला सुरुवात होते. ज्याचा थेट परिणाम आरोग्यव्यवस्थेवर होतो. वाढत्या बीपीमुळे आणि ऑक्सिजनच्या वाढत्या वापरामुळे, हृदयावर दाब येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

PM2.5 pollution in winter raises heart attack, chest pain risks: Study
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्याचे उपाय

- Advertisement -
 • पुरेशी झोप घ्या
  चांगली झोप घेतल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते. हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी व्यक्तीने पूर्ण नऊ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.
 • अनवाणी पायाने गवतावर चालणे
  हिरव्या गवतावर अनवाणी चालणे, हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे आहे. याने मन सकारात्मक होतेच, त्याचबरोबर ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते. त्यामुळे गवतावर अनवाणी चालत दिवसाची सुरुवात अवश्य करा.
 • नियमित तपासणी करणे
  हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित हृदय तपासणी करत राहा. असे केल्याने समस्या वेळेत ओळखता येऊन उपचार करणे सोपे जाते. शक्यतो हृदयरोगींनी हिवाळ्यात डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
 • व्यायाम करणे
  दररोज व्यायाम केल्याने शरीर संतुलित राहते. तसेच दिवसभराच्या कामासाठी एनर्जी मिळते. तसेच हृदय निरोगी ठेवण्यासही मदत मिळते.
 • धूम्रपान टाळा
  हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अल्कोहोल आणि धुम्रपानापासून दूर राहा.

136,400+ Cigarette Smoke Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock | Cigarette smoke on black, Blowing cigarette smoke, Electronic cigarette smoke

 • सकाळचा नाश्ता अवश्य करा
  धकाधकीच्या आयुष्यात हल्ली बरेच लोक सकाळी नाश्ता करणे विसरतात अथवा टाळतात. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, दूध असे पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
 • व्हिटॅमिन ‘डी’ने परिपूर्ण असा आहार
  खास करून ज्यांना हृदयाशी संबधित आजार आहेत, त्यांनी थंडीच्या दिवसात आपल्या लाइफस्टाईलकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. अशा लोकांनी आहारात व्हिटॅमिन ‘डी’ असलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच जेवढे शक्य होईल तेवढा वेळ सकाळचा सूर्यप्रकाश घ्यायला विसरू नका.

 


हेही वाचा ; तुम्हालाही पाठदुखीची समस्या जाणवते का?

- Advertisment -

Manini