Tuesday, April 9, 2024
घरमानिनीHealthBenefits Of Pranayam : दररोज प्राणायाम करण्याचे फायदे

Benefits Of Pranayam : दररोज प्राणायाम करण्याचे फायदे

Subscribe

प्राणायाम हा शरीरासाठी आरोग्यदायी योग आहे. प्राणायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होतो. यामध्ये व्यक्ती दीर्घ श्वास घेते आणि सोडते. प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि आयम म्हणजे घेणे. शरीरात ऑक्सिजन घेणे म्हणजे प्राणायाम. श्वास तर आपण दिवसभर घेतच असतो, पण प्राणायामाची शास्त्रीय पद्धत असून हा विशिष्ट पद्धतीने घेतलेला श्वास आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.

प्राणायाम कसा करावा –

- Advertisement -

तुम्ही कुठेही बसून प्राणायाम करू शकता, फक्त ती जागा मोकळी आणि हवेशीर असावी. सकाळचा सूर्योदय सर्वात योग्य मानला जातो, संध्याकाळी मावळत्या सूर्यसोबतही आपण हे आसन करू शकता. प्राणायम करण्यासाठी पद्मासनाच्या मुद्रात बसून डोळे बंद करावे लागतात. हे लक्षात ठेवा की, संपूर्ण आसनादरम्यान, तुम्हाला पाठीचा कणा सरळ ठेवावा लागेल. श्वासावर लक्ष केंद्रित करा. नाकातून हळू हळूहळू लांब आणि खोल श्वास घ्या. यानंतर श्वासही हळूहळू सोडा. पुढची पायरी म्हणजे तोंडातून हळूहळू श्वास घेणे, लांब आणि खोल श्वास घेणे आणि बाहेर ‘ह्म्म्म’ असा आवाज सोडणे. एक महत्वाची गोष्ट, प्राणायाम ठरताना तुमचे संपूर्ण लक्ष केवळ श्वासावर केंद्रित असणे गरजेचे आहे.

प्राणायाम करण्याचे फायदे –

- Advertisement -
  1. प्राणायाम ध्यान्यात मदत करतो. ज्यामुळे मज्जासंस्था शांत होते. परिणामी, तणावाची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे दररोज जर तुम्ही प्राणायाम केलात तर हळूहळू स्ट्रेस कमी होऊ लागतो आणि मेंदूला एनर्जी मिळते.
  2. बदलत्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात बहुतेक लोक निद्रानाशेच्या समस्येने हैराण आहेत. तुम्ही सुद्धा निद्रानाशेच्या समस्येने हैराण असाल तर दररोज प्राणायाम करण्याची सवय लावा. रोज प्राणायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप लागते आणि हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे चांगल्या आणि शांत झोपेसाठी प्राणायाम करा.
  3. प्राणायाममध्ये श्वास घेणे आणि सोडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे फुफ्फुस मजबूत होतात आणि कार्यक्षमता सुधारते. जर तुम्हालाही फुफ्फुसाशी संबंधित काही समस्या असतील तर योगाने ती समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी दररोज प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल.
  4. हाय ब्लड प्रेशरमुळे ह्रदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो. या कारणास्तव, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते.
  5. प्राणायाम करताना सर्व लक्ष श्वासोच्छवासावर केंद्रित करावे लागते. त्यामुळे, यावेळी तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाबद्दल अधिक जागरूक होतात, ज्याने माइंडफूलनेस वाढतो. एकंदरच, प्राणायाम केल्याने मानसिक आरोग्यसाठी फायद्याचा ठरतो.

 

 

 


हेही वाचा : एक सूर्य नमस्कार आहे 12 योगासनांच्या बरोबरीचा

- Advertisment -

Manini