Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthडाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

Subscribe

निरोगी आरोग्यासाठी जशी झोप महत्वाची आहे तशीच तिची पद्धत सुद्धा कारण योग्य स्थितीत झोपल्याने गाढ झोपही लागते आणि आरोग्यही उत्तम राहते. तंदुरुस्त राहण्यासाठी चांगली झोप महत्वाची भूमिका बजावत असते. जर तुम्हाला निद्रानाश आणि पचनाच्या समस्यांशी सामना करावा लागत असेल तर झोपण्यासाठी कोणती स्थिती उत्तम आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. तज्ञाच्या मते, डाव्या कुशीवर झोपल्याने आरोग्य उत्तम राहते.

जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपलात तर शरीरातील अंतर्गत अवयव व्यवस्थित काम करू शकतात. आयुर्वेदानुसार शरीराची डावी बाजू झोपण्यासाठी योग्य सांगण्यात आली आहे. जाणून घेऊयात डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे,

- Advertisement -

पचनास मदत मिळते – डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रियेला सर्वाधिक फायदा होतो. जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा पचनक्रिया सुलभ रित्या होते.

छातीत जळजळ किंवा पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो – डाव्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळ किंवा पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

- Advertisement -

मेंदूचे आरोग्यही उत्तम राहते – डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदूतील जमा झालेली जंक साफ होते. त्यामुळे अल्झायमर, पार्किसन्स अशा समस्या दूर होतात.

घोरण्यापासून आराम मिळतो – डाव्या कुशीवर झोपल्याने घोरण्यापासून आराम मिळतो. डाव्या कुशीवर झोपल्याने जीभ आत जाण्यापासून रोखली जाते आणि घोरण्यापासून बचाव होतो.

झोपेत व्यत्यय येत नाही – घोरणे आणि घशातील हवेचा प्रवाह रोखणे यामुळेही निद्रानाश होतो. वारंवार जाग येणे आणि स्लिप एपनियाच्या समस्येपासून आराम मिळतो.

हृदयासाठी फायद्यचे – डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयाकडे होणार रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे हृदयाचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

गर्भवती महिलांसाठी सुरक्षित – गर्भवती स्त्रिया जेव्हा डाव्या कुशीवर झोपतात, तेव्हा गर्भाशयाला योग्यरीत्या रक्तपुरवठा होतो. जे मुलाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

ॲसिडिटी पासून आराम मिळतो – जे लोक ॲसिडिटी आणि ॲसिड रिफ्लेक्ससारख्या समस्यांनी त्रस्त असतील अशा लोकांनी डाव्या कुशीवर झोपावे.

 

 


हेही वाचा : या’ पदार्थांमुळे होऊ शकतो पोटाचा कॅन्सर

 

- Advertisment -

Manini