Monday, June 5, 2023
घर मानिनी Health ब्रेस्ट सैल होण्याची 'ही' आहेत कारणे

ब्रेस्ट सैल होण्याची ‘ही’ आहेत कारणे

Subscribe

महिलांच्या शरिरात त्यांच्या ब्रेस्टची साइज ही नैसर्गिक पद्धतीने बदलत राहते. यामागे काही कारणं सुद्दा आहेत. खरंतर फिमेल ब्रेस्ट फॅट आणि लिगामेंट्सच्या मदतीने बनतात. तसेच मसल टिश्यू कमी झाले तरीही कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा क्रिममुळे अधिक फरक पडत नाही. पण ब्रेस्ट सैल होण्यापूर्वी आपण काही गोष्टी केल्या तर समस्या वाढण्याऐवजी ती कमी होऊ शकते.

परंतु ब्रेस्ट सैल का होते याबद्दल आधी जाणून घेणे महत्वाचे आहे. खरंतर ब्रेस्ट सैल होणे अगदी नैसर्गिक असून त्याची पुढील काही कारणं असू शकतात.

- Advertisement -

-वय वाढणे
जसे जसे महिलांचे वय वाढते तेव्हा ब्रेस्ट टिश्यू लूज होतात. ब्रेस्ट त्या अवयवापैकी एक आहे ज्यामध्ये वयाचा परिणाम आधी दिसतो. इलास्टिसिटीच्या कमतरतेमुळे ब्रेस्ट ही कमी वाढलेली आणि अंडर ब्रेस्टला सपोर्ट ही कमी होतो. मेनोपॉज पूर्वी हा बदल सर्वात अधिक होतो. जर तुम्हाला वयाआधीच तुमची ब्रेस्ट सैल होत असेल तर एक्सरसाइज करा आणि तुमच्या खाण्यापिण्यात बदल करा.

- Advertisement -

-परफेक्ट ब्रा न घालणे
ब्रेस्टची साइज कोणतीही असो पण नेहमीच परफेक्ट साइज आणि शेपची ब्रा न घालणे. जर ही सवय बदलली नाही तर वयाच्या ३५ व्या वर्षापासून ब्रेस्ट सैल होऊ लागते. हैवी ब्रेस्ट असे पर्यंत त्याकडे लक्ष द्यावे. गरजेचे नाही की, तुम्ही अंडरवायर ब्रा घातलीच पाहिजे. पण नॉर्मल कॉटन ब्रा मुळे सुद्धा ब्रेस्ट सैल होऊ शकते.

काही महिला आपल्या ब्रेस्टच्या साइजनुसार ब्रा घालत नाहीत. जर तुम्हाला असे वाटत असेल तर पुन्हा एकदा आपल्या ब्रा ची साइज पुन्हा चेक करा. बँन्ड साइज लहान आणि कप साइज मोठी असेल अशा प्रकारे ब्रा खरेदी करा.

-स्मोकिंग आणि ड्रिंकिंग
लाइफस्टाइलचा आपल्या ब्रेस्टवर प्रभाव पडतो. खासकरुन सिगरेट प्यायल्याने. स्मोकिंगमुळे इलास्टीन फायबरवर परिणाम होतो. यामुळे त्वचेची इलास्टिसिटी कमी होते. स्मोकिंगमुळे केवळ ब्रेस्ट सैलच नव्हे तर चेहऱ्यावरची त्वचा सुद्धा तुम्ही म्हातारे झाल्यासारखे दिसते.

-वजन वाढणे
ब्रेस्टच्या शेपवर वजन वाढल्याने सुद्धा परिणाम होतो. गरजेपेक्षा अधिक वजन वाढल्यास ब्रेस्टचे मसल्स स्ट्रेच होतात. हेल्दी वेटसाठी फिजिकल फिटनेस फार महत्वाचा आहे. जर तुमचे वजन फार वेगाने वाढत किंवा कमी होत असेल तर तुम्ही थायरॉइडची चाचणी करावी. त्याचसोबत वजन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा तज्ञांचा सल्ला घ्यावा.


हेही वाचा- Bad cholesterol… खराब कॉलेस्ट्रॉलचा सेक्स लाईफवरही होतो परिणाम

- Advertisment -

Manini