Sunday, December 3, 2023
घरमानिनीHealthकोलेस्ट्रॉलचा स्तर असा ठेवा नियंत्रित

कोलेस्ट्रॉलचा स्तर असा ठेवा नियंत्रित

Subscribe

बहुतांश लोक सकाळच्या नाश्ताबद्दल फार गोंधळलेले असतात. अशातच काही लोक असे ही असतात जे सकाळी उठल्यानंतर कुकीज, मफिन, बटर टोस्ट किंवा पॅक्ड सीरियल्स खाणे पसंद करतात. अशा प्रकारचा नाश्ता आरोग्यासाठी हेल्दी मानला जात नाही. या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलसह तुमच्या कंबरेची साईज ही वाढली जाते. काही लोक असे ही असतात की, नाश्तात हाय कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. (Cholesterol control tips)

जर तुम्हाला फॅटी लिवर, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरची समस्या येते. यापासून दूर राहिले पाहिजे. हेल्थ एक्सपर्टच्या मते, तुम्ही सकाळच्या वेळी जे काही खाता त्यामुळे शरिराला उर्जा मिळते. अशातच गरेजेचे आहे की, तुम्ही नाश्तात हाय प्रोटीन, हाय फायबर, हेल्दी फॅट्स आणि थोडे कार्ब्सचे सेवन केले पाहिजे. जेणेकरुन कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित राहिल. तर जाणून घेऊयात कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी तु्म्ही नक्की काय खाल्ले पाहिजे.

- Advertisement -

-ओटमील
सकाळच्या नाश्तात ओट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये तुम्ही फ्रुट्स सुद्धा वापरु शकता. ओटमीलमुळे पाचनक्रिया सुधारली जाते. यामध्ये सॉल्युबल फायबर असते जे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करतात.

-अंडी
अंड्यांमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असते. यामध्ये असलेले हाय प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. परंतु प्रयत्न करा की, अंडी खाताना त्यामधील पिवळा गर अधिक खाऊ नका.

- Advertisement -

-एवोकाडो
एवोकाडो मध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. जे गुड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढवण्यास मदत करतात. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही एवोकाडोचे सेवन केल्यास तुमचे पोट भरल्यासारखे राहते.

-बेरीज
बेरीज अँन्टीऑक्सिटेंड आणि सॉल्यूब फायबर युक्त असतात. जे कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करतात. तुम्ही याची स्मूदी तयार करुन पिऊ शकता.

-ग्रीक योगर्ट
प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स युक्त ग्रीक योगर्ट पोटाच्या आरोग्यासाठी बेस्ट मानले जाते. त्याचसोबत हे कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासही मदत करते.


हेही वाचा- आयुर्वेदानुसार ‘या’ फळांत असते Healing Power

- Advertisment -

Manini