Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthClay Pot Water : माठातले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर

Clay Pot Water : माठातले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर

Subscribe

आयुर्वेदानुसार माठातले पाणी प्यायल्याने शरीरातली दाहकता कमी होते. अशातच माठातले पाणी हे कायमस्वरूपी प्याल्याने शरीराला थंडावा मिळतो. मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहे.

माठातले थंडगार पाणी पिऊन तहान भागते. आयुर्वेदानुसार माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहे.

- Advertisement -

मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्याने ती रोग दूर करणारी असल्याचेही आयुर्वेदात म्हटले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल, तर माठातले पाणी पिणे गरजेचे आहे. फ्रिजमधले गार पाणी पिऊन अनेक समस्या निर्माण होतात. तर माठातले पाणी तुम्हाला निरोगी ठेवते. अशातच माठातले पाणी बाराही महिने चालणारे आहे. बहुतेक माणसे फक्त उन्हाळ्याच्या दिवसात याचा उपयोग करतात. पण जर का तुम्ही माठातले पाणी रोज प्यायलात तर शरीरासाठी याचा चांगला फायदा होतो.

माठातले पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे

 • माठातलं पाणी प्यायल्याने टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत.
 • फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने घसा दुखू शकतो. माठातले प्यायल्याने दुखणार नाही.
 • माठातले पाणी पिउन गळ्याला आराम मिळेल.
 • दूषित हवेपासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे.
 • शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.

Earthen Water Pot - 11 Amazing Benefits Of Clay Pot Water

 • फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते.
 • माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात.
 • उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो.
 • माठाचे पाण पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते.
 • पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
 • रक्तदाब राहतो नियंत्रणात.  तसेच त्वचेच्या समस्या होत नाहीत.

हेही वाचा :

PCOD ची लक्षणं कमी करेल ‘ही’ स्मूदी

- Advertisment -

Manini