Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthPCOS मध्ये निरोगी राहण्यासाठी डिटॉक्स वॉटर फायद्याचे

PCOS मध्ये निरोगी राहण्यासाठी डिटॉक्स वॉटर फायद्याचे

Subscribe

आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि आहारामुळे PCOS ग्रस्त महिलांची संख्या वाढत आहे. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिस्टममध्ये महिलांच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढते. हार्मोनल इम्बॅलन्स पिरीएड्स, प्रजनन क्षमता आणि वजन यावरही परिणाम करते. PCOS मध्ये वजन कमी करणे कठीण असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि हार्मोन्स बॅलन्स राखण्यासाठी योग्य आहार आणि योग्य लाइफस्टाइल महत्वाची आहे. अशावेळी PCOS मध्ये निरोगी राहण्यासाठी डिटॉक्स वॉटर पिणे फायद्याचे ठरते.

पुदिना –
PCOSमध्ये पुदिन्याची पाने अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. हे एंड्रोजन हार्मोन्सची पातळी नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहते. यासह मूड स्विंग आणि थकवाही दूर होतो.

- Advertisement -

तमालपत्र –
PCOSमध्ये तमालपत्राचे पाणी देखील फायदेशीर ठरते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि लोह हे तमालपत्रात मुबलक प्रमाणात आढळतात. यासह तमालपत्राचे पाण्यात डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म देखील असल्याने सूज ही कमी होते.

लिंबाचा रस –
PCOSमध्ये लिंबाचं रसही फायद्याचा ठरतो. लिंबाचा रस डिटॉक्सिफिकेशन आणि इन्सुलिन संवेदनशीलतेसाठी फायदेशीर आहे.

- Advertisement -

PCOSसाठी डिटॉक्स वॉटर कसे बनवाल?

साहित्य –

पाणी – 1 लिटर
पुदिन्याची पाने – 10
तमालपत्र – 1
लिंबाचा रस – 2 चमचे

पद्धत –

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सर्व काही मिसळा.
तयार पाणी 2 तास तसेच राहूद्या.
सकाळपासून तयार पाणी थोडे थोडे करून प्या.
एक लक्षात घ्या. पाणी तुम्हाला संध्याकाळी 4 च्या आत प्या.

PCOS ग्रस्त महिलांसाठी हेल्दी ड्रिंक्स –

कोरफड रस –
कोरफडचा रस शरीरातील सर्व हानिकारक विषारी द्रव्ये बाहेर काढून डिटॉक्सिफिकेशनसाठी कार्य करतो. तज्ज्ञांच्या मते, कोरफडीचा रस हार्मोनल बॅलन्स राखण्यास आणि इन्सुलिन सवेंदनशीलता सुधारण्यास मदत करतो.

मेथीचे पाणी –
मेथीचे पाणी अंडाशय निरोगी ठेवण्यास मदत करते आणि पिरियड्सचे अनेक विकार कमी करते. याशिवाय , ते इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास देखील मदत करते. तज्ज्ञांच्या मते, मेथीचे दाणे एका ग्लासात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते गाळून प्या.

हिबिस्कस टी –
हिबिस्कस टीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. जे मूत्राशय आणि गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देतात. हे रोज प्यायल्याने तुमचे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते आणि वजनही नियंत्रित राहते. हे करण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी उकळा आणि त्यात काही वाळलेल्या हिबिस्कसच्या फुलांच्या पाकळ्या घाला आणि 5 ते 10 मिनिटे भिजत ठेवा. आता ते गाळून प्या.

 

 


हेही वाचा : रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास स्ट्रेस हार्मोन वाढतो!

 

- Advertisment -

Manini