Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthतुम्हालाही पाठदुखीची समस्या जाणवते का?

तुम्हालाही पाठदुखीची समस्या जाणवते का?

Subscribe

स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता कुटुंबीयांसाठी राबणारी गृहिणी प्रत्येक घरात असतेच. नोकरी घर आणि घराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना कधी कोणते दुखणे सुरू होते, हे त्यांच्याही लक्षात येत नाही. आजकाल बहुतांश महिलांना वयाच्या चाळीशीनंतर पाठदुखीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. पण काही कारणे ही आजारांशी देखील संबंधित असतात. जे आजार प्रामुख्याने महिलांना होतात. तर, काही वेळा पाठदुखीचे कारण वय आणि जेंडर हे सुद्धा असू शकते. आज आम्ही तुम्हाला पाठदुखीची कारणे आणि त्यावरील काही उपाय सांगणार आहोत.

1,000+ Women Lower Back Pain Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock | African american woman with back pain

- Advertisement -

सर्वात पहिले आपण पाठदुखीच्या समस्यांची कारणे जाणून घेऊयात –
वाईट जीवनशैली, लठ्ठपणा, मासिक पाळीत पेटके येणे, मासिक पाळीपूर्व सिंड्रोम, गर्भधारणा उशिरा होणे यासह अनेक कारणांमुळे पाठदुखीच्या समस्या उद्भवू शकतात.

वयाच्या चाळिशीनंतरही खालील पद्धतीने तुम्ही पाठदुखीपासून सुटका मिळवू शकता –

- Advertisement -
 • दररोज व्यायाम करणे – 
  व्यायाम केल्याने पाठदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही स्ट्रेंथ एक्झरसाइझ, एरोबिक यांसारखे व्यायाम करणे गरजेचे आहे. एका संशोधनानुसार, ज्या महिला आठवड्यातून किमान 3 ते 5 वेळा व्यायाम करतात त्यांना पाठीच्या समस्यांचा धोका कमी असतो.

Woman Workout Pictures | Download Free Images on Unsplash

 • कोमट पाण्याने आंघोळ करणे –
  कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि तुमच्या स्नायूच्या वेदना कमी होऊ लागतात.
 • वजन नियंत्रित ठेवणे –
  तुम्हाला बॅकपेनची समस्या असेल तर तुम्ही वजन नियंत्रित ठेवायला हवे.
 • आइस पॅक –
  आइसपॅकच्या मदतीने तुम्ही पाठदुखीपासून आराम मिळवू शकता. अधूनमधून आइसपॅकने शेक दिल्यास पाठीचे दुखणे कमी होते.
 • बसण्याची योग्य पद्धत –
  आपण ऑफिसवर्क करताना एकाच जागी तासनतास बसून काम करतो. प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी पाठदुखीची समस्या प्रकर्षाने जाणवते. तुम्ही ऑफिसवर्क करणारे असाल तर, कामाच्या ठिकाणी उठताना बसताना काळजी घ्या. मधे-मधे ब्रेक घ्यायला विसरू नका.

 


हेही वाचा ; हृदयविकारापासून वाचण्यासाठी करा ‘या’ खाद्यतेलांचा वापर

- Advertisment -

Manini