कधी ना कधी प्रत्येकाला तोंड येतं. पण हे का येते किंवा काहीजणांना हमखास अनेकवेळा तोंड येतं. यामागची नेमकी कारणं काय आहेत ? हे आपण जाणून घेणार आहोत. अशातच तोंड आल्यावर तोंडात हलके दुखायला लागते आणि थोडीफार सूज यायला सुरुवात होते.
मुख्य म्हणजे तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे आपल्याला तोंड येतं. कारण तोंडाच्या आतील त्वचा ही अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. बाहेरची औषधोपचार करून यावर आळा घालू शकतो. पण सतत होणाऱ्या या अल्सरच्या त्रासाला काय कारण आहे ? हे डॉक्टरांकडे जाऊन विचारपूस करणे गरजेचे आहे. तसेच आता आपण पाहूया काय आहेत वारंवार तोंड येण्याची कारणे आणि यावर कोणते उपाय आपण करायला हवेत.
तोंड येण्याची ‘ही’ आहेत कारणे
- तोंड येणे हे शरीरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्ण पदार्थांचे प्रतीक आहे.
- तसेच तंबाखू, चहा, कॉफी सारखे निकोटिन युक्त पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे तोंडाची उष्णता वाढते आणि यामुळे तोंड येते.
- अशातच अतिप्रमाणात तेलकट आणि मसालेदार जेवणाचे-पदार्थाचे सेवन केल्यास तोंडाच्या त्वचेला हानी पोहचते.
- तसेच पचना संबंधित त्रास असल्यावर सुद्धा तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते.
- विशेष करून पोट साफ न होण्याच्या तक्रार यामुळे देखील सारखे तोंड येते ज्यामुळे या त्रासाला सामोरे जावे लागते.
- Advertisement -
तोंड आल्यावर करा ‘हे’ उपाय
- तोंड येणे किंवा तोंडाच्या अल्सरला घरघुती उपचार सुद्धा उपलब्ध आहेत.
- पण अगदीच जर का अल्सर जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.
- तोंडाच्या स्वच्छतेसाठी अँटीसेप्टिक लिक्विड आणि जळजळ थांबवण्यासाठी त्यावर मलम लावणे.
- सतत अल्सर का होत आहे याचे निदान झाल्यावर त्या विशिष्ट आजारावर योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी.
- जर का शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असल्यास त्यासंबंधीच्या योग्य गोळ्या घेणे गरजेचे आहे.
- व्हिटॅमिन बी साठी बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या.
- नारळपाणी, थंड दूध-दही सारख्या पदार्थांचे सेवन वाढवा.
- दररोज जेवणाची वेळ ठरवून त्यानुसार जेवण करावे. कधीही जेवू नये.
- व्हिटॅमिन ए,सी आणि ई सारख्या अँटीऑक्सिडंट ने भरपूर अशा फळांचा वापर आहारात करावा.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्यावी आणि जागरण टाळावे. तसेच दररोज भरपूर पाणी प्यावे.
हेही वाचा :
उचकी कशामुळे लागते? थांबवण्यासाठी करा ‘हे’ सोप्पे उपाय
- Advertisement -
- Advertisement -