Sunday, April 21, 2024
घरमानिनीHealthदररोज 10,000 पावले चालल्याने वजन कमी होते का?

दररोज 10,000 पावले चालल्याने वजन कमी होते का?

Subscribe

आजकालच्या बिझी लाइफस्टाइलमुळे लोकांच्या ॲक्टिव्हिटी कमी झाल्या आहेत. दिवसभर 8-10 तास एकच जागी बसून काम करणे यासारख्या गोष्टींमुळे फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, स्थूलपणासोबत अनेक आरोग्य समस्या उध्दभवण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी तुम्हाला चालणे हा व्यायाम उपयोगी पडू शकतो. दररोज 10,000 पावले चालवीत असे आपण अनेकदा ऐकतो. पण, खरंच एवढं चालल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते का?

वजन कमी करण्याच्या तंत्रांपैकी चालणे हा एक प्रभावी व्यायाम मानण्यात आला आहे. हा व्यायाम तुम्ही कोणत्याही वयात करू शकता शिवाय चालताना त्याचा विशिष्ट्य वेग नसल्यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी चालणे हा व्यायाम प्रकार निवडतात. सामान्यतः असे मानणायत येते की, 10,000 पावले चालणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. दररोज 10,000 पावले चालल्याने तुमचं वजन कमी होईलच असे नाही पण मदत नक्कीच होऊ शकते.

- Advertisement -

10,000 पावले चालणे खरच फायदेशीर?

आजकाल शारीरिक हालचाल कमी झाल्या आहेत. त्यामुळे लोक घरच्या व्यायामाकडे अधिक लक्ष देतात यात सर्वात सोपं असते ते म्हणजे चालणे. यासाठी बरेच लोक 10,000 पावलांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रेशर देतात. पण, प्रत्यक्षात प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. चालण्याची क्षमता प्रामुख्याने लिंग, वय आणि वैद्यकीय समस्यांवर अवलंबून असते. ज्या व्यक्तीला वैद्यकीय समस्या आहेत अशा व्यक्तीने 10,000 पावले चालणे हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत, तज्ञांकडून याची माहिती घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

चालण्याचे शरीराला होणारे फायदे –

शारीरिक तंदुरुस्ती –
नियमित चालल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांची तंदुरुस्ती वाढते, स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती सुधारते.

वजन व्यवस्थापन –
चालणे ही कमी प्रभावाची क्रिया आहे जी कॅलरी बर्न करू शकते आणि वजन कमी करण्यात मदत करू शकते. चालल्याने कॅलरी बर्न होतात, मेटॅबॉलिझम क्रिया वाढते परिणामी, फॅट्स कमी होऊन शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते.

हृदयाचे आरोग्य सुधारते –
चालल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन हार्ट प्रॉब्लेमचा धोका कमी होतो. चालल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. चालल्याने रक्ताची पातळी नियंत्रित राखण्यास मदत मिळते. ज्याने डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी फायदा होतो.

सांधेदुखीपासून आराम –
चालल्याने हाडांची घनता सुधारण्यास आणि सांधे मजबूत होण्यास मदत होते. ऑस्टिओपोरोसिस, संधिवात यासारख्या आजारांचा धोका चालल्याने कमी होतो.

पचनशक्ती सुधारते –
चालणे पचनास मदत करते आणि निरोगी मेटॅबॉलिझम वाढवते. जेवल्यानंतर चालणे हा व्यायाम प्रकार केल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

एनर्जी लेवल वाढते –
नियमित चालल्याने शरीरातील एनर्जी लेवल वाढते आणि थकवा दूर होतो. चालल्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो, ज्याने आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते.

 

 


हेही वाचा : उष्माघाताची समस्या टाळण्यासाठी उपाय

 

- Advertisment -

Manini