Saturday, June 10, 2023
घर मानिनी Health summer allergy : उन्हाळयात अ‍ॅलर्जीकडे करू नका दुर्लक्ष

summer allergy : उन्हाळयात अ‍ॅलर्जीकडे करू नका दुर्लक्ष

Subscribe

उन्हाळयात शरीरावाटे खूप घाम बाहेर पडत असतो. अशावेळी शरीराची काळजी कशी घ्याल. याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

हवामानातील बदल जास्त उष्णता यामुळे अंगाची लाही लाही होते. तसेच या उन्हाचा त्रास प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात होत असतो. उन्हाच्या त्रासामुळे शरीरावर मोठ्याप्रमाणात खाज आणि पुरळ येत असतात. तसेच या खाजीमुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर याचा परिणाम झालेला दिसून येतो.

Heat rash treatment and prevention, according to dermatologists

- Advertisement -

खाज सुटणे-
उन्हाळामुळे शरीराला खूप घाम येतो. तसेच हा घाम जास्त वेळ राहिला कि त्यामुळे त्वचेवर डाग येतात. अशावेळी स्वच्छ कपडे घाला. अंघोळ करा. यानंतर त्वचा कोरडी झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करा. जर खाज जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटा.

त्वचेवर पुरळ उठणे-

- Advertisement -

घामाने भिजलेल्या ओल्या अंगावर कपडे घातले तर त्वचा लगेच खराब होते. त्यामुळे शरीर चांगले पुसून घ्या. तसेच ओले कपडे घातल्याने त्वचेवर पुरळ उठतात. तसेच ज्या लोकांना सिरोसिसचा आजार आहे त्यांना जास्त पुरळ येतात. कधीकधी हे त्वचेचे संक्रमण टाळू आणि नखांपर्यंत देखील पोहोचते. यामुळे मोठा आजार उद्भवू शकतो. तसेच हे टाळण्यासाठी कोरडे कपडे घाला आणि शरीर कोरडे ठेवा. तसेच पुरळ उठलेल्या भागावर पावडर लावा आणि नखे काप. महत्वाचे म्हणजे केस स्वच्छ ठेवा.

उन्हाळ्यात येणारे घामोळे-

उन्हाळयात घाम सतत येत असल्यामुळे शरीरावर घामोळे येतात. तसेच शरीरात उष्णता वाढल्याने घाम येतो आणि या घामोळ्यामुळे शरीरावर परिणाम होतात. अशावेळी स्वच्छतेची काळजी घ्या. कोरफडीचे जेल घामोळ्या असलेल्या ठिकाणी लावा ज्यामुळे शरीराला थंड मिळेल.


हेही वाचा : Tabata Workout च्या मदतीने पटकन होईल वजन कमी

- Advertisment -

Manini