दूध हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, परंतु कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी इतरही अनेक गोष्टी खाल्ल्या जाऊ शकतात. अशातच अनेकांना दूध प्यायला आवडत नाही. तर अनेकांना दुधाचे अपचन होते, अशा परिस्थितीत कॅल्शियमच्या इतर पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. बाकी अनेक पदार्थांमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. अशातच असे काही पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करू शकता जेणेकरून दुधाइतके पोषक घटक मिळतील.
दुधासारख्या आरोग्यदायी गोष्टींची जर का सेवन तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात केलात तर शरीराला कमतरता भासणार नाही. तसेच जर का तुम्ही दूध पियत नसाल तर काळजी करण्याचे कारण नाही. तसेच खाली दिलेल्या ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि दूधा एवढे कॅल्शियम मिळवा.
1. टोफू
टोफूमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. याचा आहारात समावेश केल्यामुळे तुमची हाडे आणि दात मजबूत राहतील.
2. दही
दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तसेच एक कप दह्यामध्ये 300 ते 350 मिलीग्राम कॅल्शियम असते. अशातच रोजच्या न्याहारी आणि दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करता येईल. यामुळे शरीरात कमतरता भासणार नाही.
3. सफेद बीन्स
सफेद बीन्सला नेव्ही बीन्स असेही म्हणतात. तसेच सफेद बीन्स हा कॅल्शियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. अशातच एक कप सफेद बीन्समध्ये एक कप दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. तसेच सफेद बीन्सपासून बीन्स करी, बीन्स सूप, बीन्स सॅलड इत्यादी पोषक पदार्थ बनवता येतात.
4. फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूस
ज्यांना दूध आवडत नाही त्यांच्यासाठी फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूस हा दूधा सारखाच दुसरा पर्याय आहे. तसेच फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूसमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. अशातच कॅल्शियमने परिपूर्ण असा फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूस तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.
5. बदाम
बदाम हे कॅल्शियमचा उत्तम आणि समृद्ध स्रोत आहे. एक कप बदामात एक कप गाईच्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. ज्या लोकांना दूध आवडत नाही त्यांनी बदामाच्या दूधाचे सेवन करून पाहावे. याव्यतिरिक्त, बदाम हे व्हिटॅमिन ई चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. जो हेल्दी स्किनसाठी आणि उत्तम दृष्टी चांगली राहण्यासाठी आवश्यक आहे.
6. ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळतात. आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच ब्रोकोलीचे सूप आणि सलाड आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.