Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthथंडीत प्या हे स्पेशल सूप्स

थंडीत प्या हे स्पेशल सूप्स

Subscribe

थंडीचे दिवस सुरु झाले की सर्वाना गरमागरम पदार्थ खाण्याचे वेध लागतात. या दिवसात वायरल इन्फेकशनची शक्यता जास्त असते. त्यामुळे या दिवसात सकस आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्यांचे सूप उपयोगी पडतील कारण ते चवदार आणि पोषकतंत्वानी भरलेले असतात. हिवाळ्यात भाज्यांचे सूप शरीर उबदार ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. आज आपण असेच काही सूप पाहणार आहोत जे तुम्हाला थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील.

Einfrieren Familie Von Drei Erwärmung Nahe Warmen Heizkörper Stockfoto und mehr Bilder von Familie - iStock

टोमॅटो सूप
थंडीच्या दिवसात टोमॅटो सूप जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पण या सूपमध्ये जर चमेली असलेला चहा मिसळला तर सूपची चव आणखीनच वाढते. जसे टोमॅटोचे सूप बनवतात तसाच हा सूप देखील बनवून घ्या, त्यात थोडा चमेलीचा चहा आणि काळी मिरी घालून उकळवा. जर तुम्हाला याव्यतिरिक्त आणखी काही मसाले घालायचे असल्यास तेही तुम्ही घालू शकता.

बीटरूट सूप
तुम्ही हिवाळ्यात बीटरूट सूप बनवू शकता. या सूपचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. सूप क्रीमी बनवण्यासाठी तुम्ही क्रीमदेखील त्यात वापरू शकता. यासोबतच चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात कांदे आणि टोमॅटोही मिक्स करू शकता.

गाजर सूप
थंडीत आपण गाजराचा हलवा खातो पण यंदा तुम्ही गाजर सूप जरूर ट्राय करा. सूप चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात आले, लसूण आणि काळी मिरीही घालू शकता. हे सूप हिवाळ्यात अत्यंत फायदेशीर आहे आणि ते बनवायला देखील सोपे आहे.

बदाम आणि मशरूम सूप
हिवाळ्यात मशरूम मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्ही मशरूममध्ये बदाम टाकून सूप देखील बनवू शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास मशरूम मिक्सरमध्ये हलके बारीक करून आणि पाण्यात उकळूनही सूप बनवू शकता. चव वाढवण्यासाठी तुम्ही सूपमध्ये बदाम, लोणी, काळी मिरी, क्रीम वापरू शकता.

 

- Advertisement -

हेही वाचा ; कोरोनापासून बचाव करेल हा काढा

- Advertisment -

Manini