तुमच्याकडे सकाळचा नाश्ता करायला वेळ नाही का? मग ही बातमी पूर्ण वाचा. अनेकदा सकाळी ऑफिसला पोहचण्याच्या घाईत नोकरदार मंडळी एकतर नाश्ता न करता निघतात किंवा घाईगडबीत बाहेरच तरी खातात. पण, आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार निरोगी राहण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता फार उपयोगी आहे. आज आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत ज्या सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर उर्जावान राहू शकता आणि स्वतःला फिट ठेवू शकता.
1) दररोज रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत मिळते. तसेच कोमट पाण्याने मेटॅबॉलिझम क्रिया गतिमान होते.
2) दही हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. दही हे प्रोबायोटिक्सचे उत्कृष्ट स्रोत आहे. ते आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे पचन क्रिया सुधारते. याशिवाय दही प्रोटिन्सचा उत्तम स्रोत असल्याने जे खाल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहते.
3) तुम्ही सकाळी अक्रोड, बदाम यासारखा सुका मेवा खाऊ शकता. यामध्ये निरोगी फॅट्स, प्रोटिन्स आणि फायबर असतात. जे केवळ रक्तातील साखर नियंत्रीत करीत नाही तर ऊर्जा देखील देतात.
4) अंडे हे देखील सुपरफूड आहे. ते प्रोटिन्सने परिपूर्ण असते. याच्या सेवनाने तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहता.
5) सकाळची सुरुवात तुम्ही दुधाच्या चहाऐवजी ‘ग्रीन टी’ ने करू शकता. ते मेटॅबॉलिझम क्रिया गतिमान करते.
6) सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पोट चांगले राहते. पपई कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारांपासून संरक्षण करते.
7) टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळी टरबूज खाल्याने दिवसभर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि आपण हायड्रेट राहतो.
8) रिकाम्या पोटी मध पाण्यासोबत खाल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे तुमची मेटॅबॉलिझम क्रिया मजबूत होते आणि तुम्हाला दैनंदिन कामांसाठी शरीराला ऊर्जा मिळते.
हेही वाचा ; हिवाळ्यात पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या