Tuesday, April 16, 2024
घरमानिनीHealthCurd Rice : दही-भात खाण्याचे फायदे माहितीयेत का? जाणून घ्या

Curd Rice : दही-भात खाण्याचे फायदे माहितीयेत का? जाणून घ्या

Subscribe

अनेक लोकांना आपण पाहिले असेल की, त्यांना जेवनामध्ये दही भात खायला खूप आवडतो. मात्र, हा दही भात खाण्यासाठी जेवढा चवदार आहे तेवढाच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण दही भात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासाठी मदत होते. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे दही भात खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. जे लोक वाढलेल्या वजनामुळे भात खाणे टाळतात. त्यांनी आजच आहारामध्ये दही भाताचा समावेश करा. चला तर मग जाणून घेऊयात दही भात खाण्याचे नेमके कोणते फायदे आपल्या शरीराला होतात.

दही-भात खाण्याचे आहेत अनेक फायदे

1.आरोग्यासाठी फायदेशीर

तुमच्या नियमित आहारात दही-भाताचा समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. दही आणि भातामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं. यामध्ये कॅलरीजही खूप कमी प्रमाणात असतात. वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या नियमित डायटमध्ये समावेश करू शकता. शरीरात कमी कॅलरीज जाऊनही अनेक तास भूक लागत नाही.

- Advertisement -

2.वजन नियंत्रणात राहते

तुम्हाला जर ओव्हर इटिंगपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर कर्ड-राईसची डिश चांगला पर्याय ठरू शकते. या डिशमध्ये कॅलशियम आणि प्रोबॉयोटीक्ससारख्या बॅक्टेरियाचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे शरीराचे आरोग्य निरोगी राहते आणि पचनशक्ती चांगली राहते. तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

3.लठ्ठपणा कमी होतो

लठ्ठपणा असेल तर करा दहिभाताचे सेवन करा, जर आपले वजन आवश्यकतेपेक्षा जास्त असेल किंवा आपण लठ्ठपणाचे शिकार असाल. तर आपण दही भात खाल्ला पाहिजे, यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि आपल्या शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

4. पचनशक्ती सुधारते 

पोट बिघडलं असल्यावर अथवा अतीसाराच्या समस्येवर एक उत्तम उपाय म्हणजे दहीभात खाणे. कारण अशा वेळी तुम्ही अती तिखट अथवा तेलकट पदार्थ खाऊ शकत नाही. मात्र साधा दही भात खाण्यामुळे तुमचे पोट पुन्हा पूर्ववत होते. कारण दही आणि भात हे दोन्ही पदार्थ पचायला हलके आहे. शिवाय दह्यामध्ये प्रोबायोटीक असतात ज्यामुळे तुमच्या आतड्यामधील अपचनाची समस्या दूर होऊ शकते. बद्धकोष्ठता, पोटदुखीवर दही भात खाणं नक्कीच फायद्याचं ठरतं.

5.बद्धकोष्ठतेपासून आराम

तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी दही भात हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये चांगले बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात असतात. दही पचनसंस्थेचं कार्य सुरळीत करण्यास मदत करतात. पोटदुखीचा त्रास कमी करण्यासही मदत होते. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात नियमित दही भाताचा समावेश करा.

6. ताण-तणाव कमी

दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.

7. लठ्ठपणा कमी होतो

भात खाण्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. मात्र दही भात हे कॉम्बिनेशन वजन घटवण्यास मदत करते. वेट लॉसच्या मिशनवर असाल तर आहारात नियमित दही भाताचा समावेश करा.

दहीभाताची झटपट रेसिपी

साहित्य :
अर्धा कप घट्ट दही, एक वाटी तांदूळ, एक चमचा तेल, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, चार ते पाच कडीपत्त्याची पाने, उदडाची डाळ, सुखी लाल मिरची, कोथिंबिर आणि चवीपुरते मीठ

कृती :
भात शिजवून घ्या आणि त्यात दही मिसळून दहीभाताचे एकत्र मिश्रण करा. फोडणीच्या भांड्यात तेल गरम करा आणि त्यात कडीपत्ता, जिरे, मिरची, उडदाची डाळ, मोहरीची फोडणी तयार करा. भाताला वरून फोडणी द्या. मीठ घालून चांगल्या पद्धतीने भातात फोडणी मिक्स करा. कोथिंबीरीने वरून सजवा. दही भात खाण्यासाठी तयार आहे.

- Advertisment -

Manini