Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthपनीरचे अतिसेवन ठरू शकते हानिकारक

पनीरचे अतिसेवन ठरू शकते हानिकारक

Subscribe

शाकाहारी असणारे लोक दुधापासून बनविले जाणारे पनीर जास्त प्रमाणात खातात. हे प्रोटिन्स आणि कॅल्शिअमचे उत्तम स्रोत आहे. पनीरचा आहारात समावेश केल्यास सांधेदुखी कमी होण्यास आणि हाडे निरोगी राहण्यास मदत होते. पण असे म्हणतात की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, ते हानिकारक असते. हाच नियम पनीरच्या बाबतीतही लागू होतो. जर तुम्ही दररोज प्रमाणाच्या बाहेर पनीर खाल्लात तर ते आरोग्यसाठी घातक ठरू शकते.

Paneer (Panir) — Hong Kong Food Photographer & Stylist

- Advertisement -

वजन वाढण्याची समस्या
पनीरमध्ये कॅलरी आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण शारीरिक हालचाली करत नाही आणि जास्त प्रमाणात पनीर खातो तेव्हा तुमचे वजन वाढू लागते.

पचनाशी संबंधित अडचणी
जे लोक दररोज मोठ्या प्रमाणावर पनीर खातात त्यांना पचनाच्या संबंधित समस्या अधिक प्रमाणात जाणवतात. जसे की सूज येणे, गॅस होणे अशा समस्या जाणवू लागतात. तुम्ही जर जास्त प्रमाणात पनीर खाल्लेत तर तुम्हाला जडपणा जाणवू लागतो. ज्याने पचनाच्या संबंधित समस्या निर्मण होतात.

- Advertisement -

रक्तातील साखरेच्या पातळीवर नकारात्मक प्रभाव
जेव्हा पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा त्याचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत ज्यांना डायबिटीज किंवा बॉर्डरलाइन डायबिटीज आहे त्यांनी पनीरचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे असा सल्ला दिला जातो.

 


हेही वाचा;  ब्लड सर्कुलेशसाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

 

- Advertisment -

Manini