Friday, September 22, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health बडीशेप करेल Body Detox, आणि वेट लॉस

बडीशेप करेल Body Detox, आणि वेट लॉस

Subscribe

सध्याच्या काळात बहुतांश लोक ही वजन वाढल्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. वाढलेल्या वजनामुळे हार्ट अटॅक आणि मधुमेह सारखी समस्या निर्माण होते. वजन कमी करण्यासाठी जिमला जाणे आणि वर्कआउट करणे हा एकमात्र ऑप्शन नाही. परंतु आयुर्वेदात अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्ही वजन कमी करु शकतात. त्यापैकीच एक असलेले म्हणजे बडीशेपचे पाणी.

खरंतर बडीशेप ही आपण जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून खातो. परंतु ती तुमचे वजन ही कमी करु शकते. बडीशेपमध्ये फायबर, अँन्टीऑक्सिडेंट आणि खनिज असतात. ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. बडीशेप ही डाइजेशन आणि मेटाबॉलिज्म सुद्धा ठिक करण्यास मदत करते. तर आता तुम्हाला बडीशेपचा वापर करुन वजन कमी करायचे असेल तर नक्की काय करावे याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

एक चमचा बडीशेप रात्रभर एका ग्लासमधील पाण्यात भिजत टाका. सकाळी उठल्यानंतर त्या पाण्याचे सेवन करा. बडीशेपचे पाणी प्यायल्यानंतर पोट भरलेल्यासारखे वाटते. त्यामुळे अधिक खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन सहज कमी होऊ शकते. या व्यतिरिक्त बडीशेप खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या ही कमी होते.

- Advertisement -

बडीशेपमध्ये असलेले असेंशियल ऑइल शरिरातून टॉक्सिन काढून रक्त शुद्ध करण्यास मदत करते. तसेच टिश्यूजला उर्जा देण्यासाठी मेटाबॉलिज्म महत्वाची भुमिका बजावते. बडीशेप मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकते. खासकरुन उपाशी पोटी याचे सेवन केल्यास शरिराला याचा अधिक फायदा होतो.


हेही वाचा- Women’s Health : महिलांसाठी उपयुक्त बीट ज्यूस

- Advertisment -

Manini