बदलती लाइफस्टाइल, ताणतणाव, लग्नाचे वाढलेले वय, उशिरा होणारी गर्भधारणा अशा अनेक कारणांमुळे गर्भाशयात स्नायूंच्या गाठी होण्याचे परिमाण वाढले आहे. साधरणपणे 30 ते 40 वर्ष वयाच्या महिलांमध्ये गाठीची अर्थात फायब्रॉईडची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान रक्तस्रावाचे प्रमाणही वाढत.
गर्भाशयातील फायब्रॉइड्सना लेओमायोमास किंवा मायोमास देखील म्हटले जाते. फायब्रॉईडच्या लक्षणांमध्ये मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे, मूत्राशयावर दाब येणे, कंबर दुखणे, बद्धकोष्ठता, 7 दिवसांपेक्षा जास्त काळ रहाणारी मासिक पाळी, रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तस्त्राव यांचा समावेश होतो. गर्भाशयातील फायब्रॉइड्स जीवघेणे नसतात. मात्र, अति रक्तस्त्रावामुळे महिलेला थकवा जाणवू शकतो. महिलेला नैराश्य, स्ट्रेस, चिंता, भीती यांचाही सामना करावा लागतो.
फायब्रॉईडची लक्षणे –
- पिरियड्स दरम्यान जास्त रक्तस्त्राव
- पिरीएड्समध्ये ओटीपोटात तीव्र वेदना
- शरीरात अशक्तपणा
- पिरीएड्स संपल्यानंतरही प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होणे
- प्रायव्हेट पार्टमधून दुर्गंधीयुक्त स्त्राव निघणे, हे अनेकदा फायब्रॉईडच्या संसर्गामुळे होते.
- सतत लघवीला होणे.
- प्रेग्नसीमध्ये अडथळा येते.
फायब्रॉइडवर उपचार –
फायब्रॉइडवर अनेक पद्धतीने उपचार केले जातात. जे फायब्रॉईडच्या आकारावर आणि स्वरूपावर अवलंबून असतात. ज्या मुलींना गरोदर व्हायचे असते त्या मुलींना फायब्रॉईडचा आकार कमी करण्यासाठी हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जाते. याशिवाय इतर स्त्रियांमध्ये फायब्रॉईड शस्त्रक्रियेद्वारे काढले जाते किंवा संपूर्ण गर्भाशय काढले जाते. मात्र, हल्ली अनेक नवीन उपचार पद्धती येऊ लागल्यात त्यानुसार गर्भाशयाला त्रास न देता फायब्रॉईड काढले जाते. शस्त्रक्रिया नसलेल्या उपचारनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारा ट्युमर नष्ट करण्यात येते. तर दुसऱ्या उपचारात एमआरआयच्या मदतीने अल्ट्रासाउंड शस्त्रक्रिया करण्यात येते. यात फायब्रॉईडचे लहान तुकडे करून ते शरीराद्वारे बाहेर काढले जातात.
हेही वाचा : सिंगल वुमन्सने अवश्य कराव्यात ‘या’ मेडिकल टेस्ट