Friday, March 1, 2024
घरमानिनीHealthफिटनेस फंडा : सेलिब्रिटी करतात 'हा' प्रोटीन ब्रेकफास्ट

फिटनेस फंडा : सेलिब्रिटी करतात ‘हा’ प्रोटीन ब्रेकफास्ट

Subscribe

आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामासोबत आपण योग्य आहार करणे गरजेचे असते. हल्लीच्या तरुणांमध्ये फिटनेसचे वेड हे अधिक प्रमाणात दिसून येते. तरुणमंडळी त्यांचा फिटनेस फंडा राखण्यासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना फॉलो करतात. प्रियांका चोप्रापासून ते आलिया भटपर्यंत अनेक सेलेब्रिटी सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनयुक्त आहार घेतात कारण दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्वाचा असतो. आज आपण सेलेब्रिटींचा फिटनेस फंडा जाणून घेणार आहोत,

रकुल प्रीत सिंग –
रकुल प्रीत सिंग सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनने परिपूर्ण असे रिच पेय पिते. हे तिच्या वर्कआउटनंतर तिच्या शरीराला हायड्रेट राखण्यास मदत करते. नारळाचे दूध, पाणी, दह्यातील प्रोटिन्स, अंबाडीच्या बिया आणि केळी यांचे मिश्रण करून तुम्ही हे सहज बनवू शकता. मिश्रण एकत्र केल्यानंतर चव वाढविण्यासाठी तुम्ही त्यात थोडी दालचिनी आणि वेलची पावडर घालू शकता. जर तुम्हाला पेयामध्ये थोडा स्वीटनेस हवा असेल तर त्यासाठी मध वापरा.

- Advertisement -

आलिया भट्ट –
तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी कमी वेळात नाश्ता बनवायचा असेल तर आलियाचे चिया पुडिंग अवश्य खा. चिया बिया मध्यम आचेवर भाजून घ्या. यानंतर एका भांड्यात प्रोटीन पावडर आणि नारळाचे दूध एकत्र करा. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्या. आता भाजलेल्या चिया बियांमध्ये हेल्दी स्वीटनर घाला. तयार मिश्रण 30 ते 40 मिनिटे गोठवण्यासाठी ठेवा. पुडिंग थंड झाल्यावर झाल्यावर त्यावर काजू आणि फळे घालून त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

दीपिका पदुकोण –
दीपिका हाय प्रोटिन्स आणि कॅलरीयुक्त आहार घेते. दीपिकाला नाश्त्यामध्ये इडली सांबर सारखे पदार्थ खायला आवडतात. पण, जेव्हा फिटनेसचा प्रश्न येतो तेव्हा नाश्त्यात टोस्टसोबत दोन पांढरी उकडलेली अंडी दीपिका खाते.

- Advertisement -

शिल्पा शेट्टी –
फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीला फिटनेसच्या बाबतीत अनेकजण फॉलो करतात. ती नाश्त्यात प्रोटीन स्मूदी घेते. प्रीमियम बदाम, डार्क चॉकलेट, ब्राऊन शुगर मिश्रित स्मूदी तुम्ही अवश्य पिऊ शकता. तुम्हाला आवडत आणि हवे असल्यास अन्य पदार्थ त्यात टाकून पिऊ शकता.

 

 

 

 


हेही वाचा : हे’ 5 पदार्थ खाल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

- Advertisment -

Manini