Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीHealthजेवणाच्या ताटात कोणते पदार्थ किती प्रमाणात असावेत, जाणून घ्या

जेवणाच्या ताटात कोणते पदार्थ किती प्रमाणात असावेत, जाणून घ्या

Subscribe

चांगले आरोग्य राखण्यासाठी शरीराला अनेक प्रकारच्या आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. पण जसजसं आपलं वय वाढतं तसतशा आपल्या अन्नाच्या गरजाही बदलत जातात. त्यानुसार आपल्या आहारातच बदल होत नाही तर त्याच्या प्रमाणातही बदल होतो.यामुळे आपल्याला जेवणात कोणता पदार्थ किती प्रमाणात खाणे गरजेचे आहे समजणे गरजेचे आहे. अन्यथा अॅसिडीटीबरोबरच पचन क्रियेशी संबंधित व्याधींबरोबरच वजन वाढण्याच्या समस्याही उद्भवतात.

चांगला आहार म्हणजे संतुलित आहार. पण हा आहार नक्की कसा असावा हेच आपल्याला माहित नसतं.तज्त्रांच्या माहितीप्रमाणे प्लेटच्या अर्ध्या भागामध्ये रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश असावा, एक चतुर्थांश पातळ प्रथिने, जसे की बीन्स, टोफू, मासे किंवा कोंबडी, आणि उरलेल्या एक चतुर्थांशमध्ये संपूर्ण धान्य, जसे की क्विनोआ, ब्राऊन तांदूळ, संपूर्ण गहू, यांचा समावेश असावा. रोजच्या आहारात जर असा समतोल राखला तर त्यातून अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा होतो.

शरीराला अनेक कार्यांसाठी योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. यासाठी 8-10 ग्लास पाणी प्यावे. अन्यथा,डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते आणि परिणामी, मूर्च्छा येणे किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्नायू मजबूत होण्यासाठी ,रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि उर्जेची पातळी राखण्यासाठी प्रोटीनची गरज असते.

आपल्या आहारात पातळ प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा, जसे की मांस, मासे, टोफू आणि शेंगा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाळी, तांदूळ, नट आणि बिया यांचे सेवन करा.

कर्बोदकांचे काम शरीराला ऊर्जा पुरवणे आहे, त्यामुळे आहारात फायबर ,कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. फळे, त्यासाठी आहारात भाज्या, संपूर्ण ब्रेड, कडधान्ये आणि क्विनोआचा समावेश करावा.

लठ्ठपणा आणि मधुमेहाचा संबंध साखरेच्या अतिसेवनाशी आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही प्रक्रिया केलेले अन्न किंवा साखर असलेले पदार्थ खरेदी करता तेव्हा त्याचे लेबल वाचा जेणेकरून तुम्ही तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकाल. साखरेप्रमाणे, चरबी देखील हानिकारक आहे.

बरेचजण फ्रेश राहण्यासाठी सतत चहा कॉफी घेतात. पण त्यामुळे शरीराला फायदा तर होत नाही पण अपाय मात्र होतो. एनर्जी ड्रिंक्स किंवा एस्प्रेसो पिल्याने थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. यामुळे कॅफीनयुक्त पेय टाळावे.

वेळेवर जेवल्याने लठ्ठपणासारख्या समस्या होत नाही. यामुळे जेवणाचे आठवड्याचे टाईम टेबल बनवावे.

Manini