Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthपावसाळ्यात होणाऱ्या फूड पॉयझनिंगपासून असा करा बचाव

पावसाळ्यात होणाऱ्या फूड पॉयझनिंगपासून असा करा बचाव

Subscribe

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाऊ नयेत असे सांगितले जाते. कारण पावसाळ्यात फूड पॉयझनिंगची समस्या फार वाढली जाते. यामुळे पोट दुखी, उलटी होणे, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवतात. खरंतर फूड पॉइजिनिंगची समस्या दूषित पदार्थ खाल्ल्याने होते. त्याचसोबत पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने बॅक्टेरिया सहज फैलावतो. बॅक्टेरियायुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. अशातच पावसाळ्यात फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी नक्की काय करावेत याच संदर्भात खास टीप्स. (Food poisoning in monsoon)

शिळे पदार्थ खाण्यापासून दूर रहा
पावसाळ्यात शिळे अन्नपदार्थ खाण्यापासून दूर रहा. कारण यावेळी पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतो. ते अन्नपदार्थांना चिकटून राहतात. अशातच फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

अर्ध कच्चे पदार्थ खाऊ नयेत
कधी-कधी अर्धवट कच्चे शिजलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण बाहेरुन आणलेल्या भाज्या किंवा नॉनव्हेज पदार्थांवर बॅक्टेरिया असतात. जेव्हा पदार्थ व्यवस्थितीत शिजत नाहीत तो पर्यंत त्यामधील किटाणू जीवंत राहतात. अशातच फूड पॉयझनिंगची समस्या वाढू शकते. त्यामुळे अन्नपदार्थ नेहमीच उच्च तापमानाला शिजवून खाणे फायदेशीर असते.

फळं आणि भाज्या स्वच्छ करा
फळं आणि भाज्यांचे सेवन करण्यापूर्वी त्या स्वच्छ धुवून घ्या. कारण पावसाळ्यात व्हायरस आणि बॅक्टेरिया यावर सहज चिकटले जातात. जर फळं आणि भाज्या स्वच्छ धुतल्याशिवाय खाल्ल्यास तर बॅक्टेरिया तुमच्या शरिरात जाऊ शकतात.

- Advertisement -

किचनची स्वच्छता राखा
पावसाळ्यात किचनची स्वच्छता राखणे सुद्धा फार महत्वाचे आहे. कटिंग बोर्ड, चाकू किंवा भांडी स्वच्छ धुवून ठेवा. यामुळे बॅक्टेरिया तेथे जमा होणार नाहीत. त्याचसोबत तुम्ही फूड पॉयझनिंगपासून दूर रहाल.

आधीपासूनच कापलेले फळं घालू नका
पावसाळ्यात आधीपासूनच कापलेली फळं कधीच खाऊ नका. कारण फळांवर बॅक्टेरिया चिकटून राहू शकतात. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. जेव्हा फळांचे सेवन करायचे असेल तर ती ताजी असावीत आणि तेव्हाच खाल्ली पाहिजेत.

स्ट्रिट फूड खाणे टाळा
स्ट्रिट फूड पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळले पाहिजेत. कारण ते खुल्यावर विक्री केले जातात. त्यावर बॅक्टेरिया असण्याची अधिक शक्यता असते. अशातच तुम्ही ते पदार्थ खात असाल तर फूड पॉयझनिंग होण्याची समस्या उद्भवेल.


हेही वाचा- पावसाळ्यात पाणीपुरी म्हणजे आजारपणाला आमंत्रण

- Advertisment -

Manini