Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health प्रेग्नेंसीमध्ये हेअरफॉलची समस्या 'या' टीप्सने करा दूर

प्रेग्नेंसीमध्ये हेअरफॉलची समस्या ‘या’ टीप्सने करा दूर

Subscribe

प्रग्नेंसी दरम्यान महिलांच्या शरीरात काही बदल होतात. या दरम्यान हार्मोन सातत्याने बदलत असल्याने काही समस्यांचा सामना करावा लागतो. बहुतांश महिलांना प्रेग्नेंसीमध्ये आपल्या केसगळतीची चिंता सतावते. खरंतर प्रेग्नेंसीमध्ये हेअरफॉल होणे सामान्य बाब आहे. ही समस्या एखाद्याला अधिक तर एखाद्याला कमी प्रभावित करते. परंतु याचा सामना प्रत्येक महिलेला करावा लागतो. प्रेग्नेंसीमध्ये होणाऱ्या हेअरफॉलच्या स्थितीला टेलोजेन एफ्फ्लूवियम असे म्हटले जाते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पुढील काही टीप्स जरूर वापरू शकता.

खाण्यापिण्याकडे लक्ष द्या
आपल्या डाएटमध्ये अधिक प्रमाणात लक्ष द्या. त्यामध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करा. फ्लेवोनॉइड आणि अँन्टीऑक्सिडेंट युक्त फळांचे सेवन करा. जेणेकरुन तुम्ही हेअरफॉलची समस्या कमी करू शकता.

- Advertisement -

बायोटिन आणि सिलिकायुक्त शॅम्पूचा वापर
बायोटिन आणि सिलिकायुक्त शॅम्पू मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात. जर तुम्ही आधीपासूच सल्फेट युक्त शॅम्पूचा वापर करत असाल तर तो अजिबात वापरू नका. बायोटिन आणि सिलिका केसांसाठी फार आवश्यक तत्त्व आहेत, जे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत करण्यास मदत करतात.

ओलसर केस विंचरू नका
प्रेग्नेंसी दरम्यान केस धुतल्यानंतर ओलसर केस अजिबात विंचरू नका. कारण यावेळी केस मूळापासून डॅमेज आणि कमकुवत होतात. अशातच ओलसर केसांवर शॅम्पू केल्यानंतर केस विंचरल्यास हेअरफॉलची समस्या होऊ शकते.

- Advertisement -

अधिक घट्ट हेअर स्टाइल करू नका
प्रेग्नेंसीमध्ये अधिक घट्ट अशी हेअर स्टाइल करू नका. कारण जर ते अधिक खेचले गेले तर तुटू शकतातच. पण हेअरफॉलची समस्या ही होऊ शकते.


हेही वाचा- ब्रेस्ट फिडींग करणाऱ्या मॉमचा असा हवा डाएट

 

- Advertisment -

Manini