प्रदूषित हवेमुळे तणाव आणि चिंता आता वाढू लागली आहे. यामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका देखील आता वाढत चाला आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणाची पातळी आता भीतीदायक झाली आहे. संपूर्ण परिसरात प्रदूषणाने आता गंभीर पातळी गाठली आहे. दूषित हवेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे.
वायू प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसावर आणि श्वासोच्छवासावर होतो. पण, त्यामुळे मधुमेहही वाढू शकतो. असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्याचे दुष्परिणाम केवळ एवढ्यापुरते मर्यादित नसून दूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळे तुमचा मूड बदलतो आणि तणाव, नैराश्य, चिंता याबरोबरच चिडचिडेपणाही वाढू शकतो. तर या प्रदूषणापासून स्ट्रेस कसा कमी करता येईल हे पाहणार आहोत. तसेच जर तुम्हाला प्रदूषणामुळे तणाव आणि चिडचिडेपणाची होत असेल तर या योगासनांमुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
1. पश्चिमोत्तनासन
हा योग केल्याने संपूर्ण शरीराला फायदा होतो. सर्वात जास्त म्हणजे मनाला शांती मिळते आणि मानसिक समस्या कमी होऊ लागतात.त्याच्या मदतीने तणाव, नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्या देखील दूर होतात . असे नियमित केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि त्यामुळे मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजनही मिळतो.
पश्चिमोत्तनासन कसे करावे
- हे आसन करण्यासाठी चटईवर शांत ठिकाणी बसावे.
- मग तुमचे दोन्ही पाय जमिनीवर पसरवावे.
- दीर्घ श्वास घेत आपले हात वर करा आणि कंबर सरळ ठेवा.
- हळूहळू शरीर पुढे वाकवा.
- आपल्या पायाच्या तळव्याने आपल्या हातांना स्पर्श करा.
- नाक गुडघ्याजवळ घ्या.
- काही काळ या स्थितीत रहा.
- या स्थितीत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा
- आता हळूहळू वरच्या दिशेने सरळ व्हा.
2.बालासना
बालासन केल्याने मज्जासंस्था व्यवस्थित काम करते. मन शांत राहते. हा योग केल्याने मानसिकता चांगली राहते. तसेच मेंदूचा फोकस वाढतो आणि कोर्टिसोलची पातळी कमी होते. ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
बालासन कसे करावे
- बालासन करण्यासाठी सर्वात आधी वज्रासनात बसावे.
- यानंतर श्वास घेताना दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ करा.
- आता श्वास सोडा आणि शरीर पुढे वाकवा.
- हे झाल्यावर तुमचे तळवे जमिनीला स्पर्श करेपर्यंत शरीर वाकवत रहा.
- आता तुमचे डोकेही जमिनीवर ठेवा.
- हे आसन करताना छान आराम करा आणि दीर्घ श्वास घेत राहा.
________________________________________________________________________