Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीHealthघाईघाईत खाण्याची सवय आहे? जाणून घ्या तोटे

घाईघाईत खाण्याची सवय आहे? जाणून घ्या तोटे

Subscribe

अन्न हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. अन्न नेहमी सावकाश आणि चघळत खायला हवे. असे आपण नेहमीच वडिलधाऱ्यांकडून ऐकत आलो आहोत. पण, आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे वेळेवर जेवायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत, अनेक जण पटापट जेवण्याचा प्रयन्त करतात. पण, तुम्हाला माहित आहे का? की, घाईघाईत खाल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतात.

उतावीळपणाने अन्न खाल्याने वजन वाढीला आमंत्रण मिळतेच शिवाय डायबिटीसारख्या आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हालाही अन्नपदार्थ पटापट घाईघाईत खाण्याची सवय असेल इतर वेळीच सावध व्हा, याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊयात, घाईघाईत खाण्याच्या सवयीचे तोटे.

  • घाईघाईत खाण्याच्या नादात आपण अनेकदा अन्नपदार्थ नीट न चावता तसेच गिळतो. मात्र, असे केल्याने पचनसंस्थेला अन्न नीट पचवणे अवघड होते. अशाने पोट वाढते शिवाय वजन वाढीलाही आमंत्रण मिळते.
  • पटापट खाल्याने अन्न पचविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्याने डायबिटीसचा धोका वाढतो.

  • घाईघाईत खाल्याने अपचन होऊ शकते. यामुळे गॅस, पोटदुखी, ऍसिडिटी सारख्या समस्या निर्मण होतात.
  • पटापट अन्नपदार्थ खाल्याने घशात अडकू शकते. अशाने ठसका लागणे किंवा श्वासनलिकेत पदार्थ अडकून मृत्यू होण्याचा धोका निर्माण होतो.
  • जेव्हा तुम्ही घाईघाईत अन्नपदार्थ खाता तेव्हा तुम्हाला अन्नाची चव चाखता येत नाही. यामुळे खाण्यातील रस कमी होतो.
  • खाण्याच्या घाईमुळे शरीराच्या भुकेच्या संवेदनावरही परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपण घाईत खातो तेव्हा आपल्या मेंदूला ‘पोट भरले आहे’ असा सिग्नल मिळण्यास वेळ लागतो. यामुळे आपण अन्न सर्वाधिक खातो. परिणामी, वजन वाढू लागते.
  • घाईघाईत अन्नपदार्थ खाल्याने स्ट्रेस वाढू लागतो. याचा तुमच्या मानसिक आणि शरीराइक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  • पटकन, घाईघाईत खाल्याने तुम्ही अन्न नीट चावून खात नाही, यामुळे तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.

यामुळे अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा. अन्न हे केवळ भूक मिटविण्याचे साधन नसून ते आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा एक महत्वाचा स्तोस्त्र आहे. त्यामुळे अन्न हे कायम नीट चावून खात त्याचा आनंद घ्यायला हवा.

 

 


हेही वाचा : Kitchen Tips : महिलांसाठी खास टिप्स

Manini