Monday, April 22, 2024
घरमानिनीHealthHealth Care : जेवणानंतर गोड खाताय?

Health Care : जेवणानंतर गोड खाताय?

Subscribe

दिवसभराचं कामकाज संपवून, थकून-भगून घरी आल्यावर कुटुंबियांसोबत गप्पा मारत जेवण्याची मजा काही औरच असते. पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा सगळेच जमलेले असतात आणि जेवणानंतर काही गोड खाण्याची टूम निघते. जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ किंवा मिठाई खाण्याची सवय आपल्यापैकी बहुतांश लोकांना असते. पण जेवणानंतर विशेषत: रात्रीच्या जेवणानंतर नेहमी गोड खाण्याची ही सवय अनेक रितीने आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री जेवल्यानंतर मिठाई खाल्ल्याने शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते, ज्याबद्दल कदाचित बऱ्याच जणांना माहितही नसेल. त्यामुळे लगेच एका दिवसात अति गोड खाण्याची सवय पूर्णपणे सुटणं शक्य नाही. किती प्रमाणात गोड पदार्थ खाता यावर लक्ष ठेवा.

वजन वाढणं

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. मिठाईमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर मिठाई खाणे आवर्जून टाळा. तसेच जेवण आणि झोप यात कमीत कमी 2 तासांचे अंतर ठेवा. जेव्लायवर लगेच झोप नका, थोड शतपावली करा. नाहीतर गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

- Advertisement -

मधुमेह

सतत गोड पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेहाचा धोका बळावतो. गोड पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. तसचं येता जाता गोड पदार्थ खात असाल तर शरीरात सतत इन्शुलिन तयार होत राहतो. या सर्वाचा परिणाम शरीरावर होवून मधुमेहासोबतच डोकेदुखी, मूड स्विंग अशा समस्या निर्माण होवू शकतात.

इतर समस्या

जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातांच्या समस्या निर्माण होतात. दातदुखी किंवा दातांना किड लागणं अशा समस्या निर्माण होतात. गोड पदार्थांच्या सेवनामुळे हाडं ठिसूळ होवून सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या उद्भवतात. तसचं पिंपल्स आणि त्वचा तेलकट होते. यासाठीच गोड पदार्थांचं नियंत्रणात सेवन करणं गरजेचं आहे.

- Advertisement -

हृदयावर परिणाम

रात्री सतत मिठाई खाल्ल्याने तुमच्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. जास्त साखरयुक्त पेय प्यायल्याने, गोड पदार्थ खाल्याने वजन वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयावर परिणाम झाल्यास ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरते.

झोपेवरही होतो परिणाम

तज्ज्ञांच्या मते, रात्री गोड खाल्ल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. यामुळे मेंदू सक्रिय होतो, ज्यामुळे तुमचे रात्रीचे झोपेचे चक्र विस्कळीत होऊ शकते. झोपेची कमतरता असणे हे देखील अनेक आजारांचे कारण आहे.

- Advertisment -

Manini