Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीHealthHealth Care : जमिनीवर झोपल्याने होतील 'हे' आजार दूर

Health Care : जमिनीवर झोपल्याने होतील ‘हे’ आजार दूर

Subscribe

पूर्वीच्या काळात जास्त सुविधा नव्हत्या. पण पूर्वीच्या काळी लोक आजारी पडत नसत. आजच्या काळात जितक्या सुविधा आहेत तितक्याच आजार आहेत. पूर्वी लोक जमिनीवर झोपायचे. तर आजकालचे लोक मखमली गादीवर झोपतात.पण तुम्हाला माहितेय का की जर कोणी जमिनीवर झोपले तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जमिनीवर झोपण्याचे कोणते आरोग्यासाठी फायदे आहेत.

पाठदुखी कमी होते

आजकाल अनेकांना सतत पाठदुखीचा त्रास जाणवत असते. बैठी जीवनशैली, सतत खुर्चीवर अथवा बसून राहणं यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी शारीरिक हालचाल करता येत नाही. ज्यामुळे सांधेदुखी, कंबर दुखी असे त्रास जाणवू लागतात. ज्यामध्ये मऊ गादीवर झोपण्यामुळे तुमची समस्या अधिक वाढी शकते. मात्र जर अशा लोकांनी जमिनीवर अथवा कडक गादीवर झोपण्याचा प्रयत्न केला तर पाठदुखी नक्कीच कमी होते.

शरीराचे बॉडी पॉश्चर सुधारते

शरीराचे बॉडी पॉश्चर बरोबर नसल्यास पाठदुखीच्या समस्येसोबतच पाठीच्या कण्यातील समस्याही वाढू शकतात. पण जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ ठेवणे सोपे जाते.

झोप न लागणे

अनेक वेळा झोपण्यासाठी गाधीचा वापर केला जातो. पण या गाधीमुळे झोप अपुर्ण होते. वास्तविक सांगायचे झाले तर, झोपण्यासाठी व्यवस्थित जागा न मिळाल्यामुळे अनेकांना रात्री झोप लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये जमिनीवर झोपणे अधिक फायदेशीर ठरू शकते. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण शरीराला सवय झाली की, काही वाटणार नाही.

शरीराला थंडावा मिळतो

उन्हाळ्यात जमिनीवर झोपल्याने झोपल्याने शरीर थंड राहते आणि ब्लड सर्कुलेशन सुधारते, जे हृदय व मनाच्या आरोग्यासाठी चांगले असते. ज्यांना झोपताना जास्त उष्णता जाणवते त्यांच्यासाठी जमिनीवर झोपणे आरामदायक आहे.

ताणतणाव कमी होतो

जमिनीवर झोपल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूचे मध्यभागी आरोग्यही चांगले राहते. असे केल्याने व्यक्तीचे शरीराचे बॉडी पॉश्चर देखील सुधारते.

रक्तप्रवाह सुधारतो

शारीरिक क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत असायला हवा. एका संशोधनात रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शवासन करण्याचे फायदे सांगण्यात आलेले आहेत. कारण जमिनीवर झोपून शवासन केल्याने तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर जमिनीवर झोपा.

Manini