घरामध्ये कधी कधी खूप डास येतात. अशावेळी काय करायचे सुचत नाही. तसेच डासांमुळे अनेक गोष्टी या खराब होतात. महत्वाचे म्हणजे डासांमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो. जसे की अंगाला खाज येणे,पुरळ येणे अलर्जी होणे अशा एक आणि अनेक समस्या आपल्याला होत असतात. एखाद्या ठिकाणी आपल्याला जर डास चावला तर त्याच्या चावण्यामुळे शरीरातील रक्त दूषित होते. आणि याचा परिणाम आपल्या स्किन आणि बॉडी वर झालेला दिसून येतो. दरम्यान,डासांन पासून कशी काळजी घ्यायला हवी आणि घरामध्ये कशी स्वच्छता राखावी हे आपण जाणून घेणार आहोत.
- Advertisement -
- आपल्या घराच्या जवळ किंवा इमारतीत, चाळीत, वस्तीत पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.
- घरातील साठवण्याची भांडी झाकलेली आहेत का हे एकदा तपासा. तसंच, त्यातलं पाणी ठरावीक दिवसांनी बदलावं.
- आवश्यकतेनुसार कीटकनाशकं, कॉइल्स आदींचा वापर करावा. शाळा, तसंच कामाच्या ठिकाणीही ही काळजी घ्यावी.
- घरामध्ये कापूर जळवा ह्यामुळे घरातील हवा स्वच्छ राहील.
- रात्री जोपताना बॉडीला कडुलिंबाचे किंवा नारळाचे तेल लावावे. यामुळे डास जवळ येणार नाहीत.
- निलगिरीच्या तेलामध्ये लिंबूचा रस पिळा,आणि हे तेल चेहऱ्याला लावा यामुळे डास चावणार नाहीत.
- लॅव्हेंडरच्या फुलांमुळे घरातील डास पळून जातात त्यामुळे याचा स्प्रे नक्की घरात मारा.
- घराच्या बाहेर काळी तुळस असेल तर उत्तम यामुळे घरात डासांची पैदास होत नाही.
- झेंडूची झाडं घराजवळ लावा त्यामुळे डास येत नाही. झेंडूच्या सुगंधामुळे डास वाढत नाही.
- टी-ट्री ऑइल हे चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्याला डास चावत नाहीत. याचबरोबर शरीराला कोणत्याही प्रकारची खाज येत नाही.
हेही वाचा : Oral Health Of Kids : लहान मुलांच्या ओरल हेल्थसाठी वापरा ‘या’ टिप्स
- Advertisement -