Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthजखम घरीच स्वच्छ कशी करावी?

जखम घरीच स्वच्छ कशी करावी?

Subscribe

अनेकजण जखम स्वच्छ करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा अल्कोहलचा वापर करतात. काहींच्या मते, जखम उघडी ठेवल्यास ती लवकर भरते. परंतु, जखमेवर अल्कोहल वापरणं चुकीचं आहे. त्याच्या फायद्यांपेक्षा नुकसानच अधिक होते. कापल्यामुळे एखादी जखम झाल्यास त्यावर अल्कोहलचा वापर केल्याने टीश्यूचे नुकसान होते तसेच जखम भरण्याची प्रकिया मंदावते. अल्कोहलमुळे बॅक्टेरियल अ‍ॅक्टिव्हिटी वाढल्याने हेल्दी त्वचेचेदेखील नुकसान होते. जळजळ वाढते. सूज , खाज, जळजळ आणि वेदना वाढण्याचा धोका असतो. हायड्रोजन पेरॉक्सॉईडदेखील जखम स्वच्छ करण्यासाठी वापरणं त्रासदायक ठरू शकते.

जखम अशी करा स्वच्छ

Cuts And Lacerations: 24-Hour Emergency Room Treatment, 47% OFF

  • जखम स्वच्छ करण्यासाठी ती वाहत्या पाण्याखाली धरा.
  • जखम स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाचा किंवा कोणत्याही माईल्ड सोपचा वापर करू शकता.
  • पाण्याखाली जखम धरताना त्याच्या जवळील घाण, कचरा स्वच्छ करा.
  • पाण्याने जखम स्वच्छ केल्यानंतर टॉवेलने जखम स्वच्छ पुसावी.
  • त्यानंतर त्यावर अ‍ॅन्टीबायोटिक क्रीम लावा.
  • परंतु, जखमेतून सतत रक्त वाहत असेल किंवा जखम खोल असेल तर घरगुती उपाय टाळावे.
  • हळद,  कोरफड यासारखे नैसर्गिक उपाय केल्याने काही वेळेस जखम अधिक चिघळते किंवा त्रासदायक होऊ शकते. अशावेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा :

शरीरासाठी पाण्याइतकेच ऊनही गरजेचे

- Advertisment -

Manini