Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthगर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा टाळाल?

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा टाळाल?

Subscribe

बदलत्या लाइफस्टाइलमुळे हल्ली अनेक महिला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरच्या बळी ठरत आहे. हा कॅन्सर गर्भाशयाच्या पेशींमध्ये विकसित होतो. हा गर्भाशयाचा खालचा भाग आहे, जो योनीला जोडतो. हा कॅन्सर केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर महिलांसाठी गंभीर समस्या बनली आहे. पण, काही चांगल्या सवयी लावून हा कॅन्सर स्वतःपासून दूर ठेवला जाऊ शकतो.

- Advertisement -

नियमित तपासणी आवश्यक –
२० वर्षावरील मुलींनी हा कँन्सर टाळण्यासाठी नियमित तपासणी करायला हवी. नियमित पॅप स्मिअर टेस्टमुळे गर्भाशय ग्रीवामधील कोणतेही असामान्य बदल सहज ओळखता येतात. ज्याने लवकर उपचार केले जाऊ शकतात.

सुरक्षित लैगिक संबंध –
जर तुम्हाला HPV आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरशी संबंधित सेक्सशुल ट्रान्समिटेड डिसीज होण्यापासून बचाव करायचा असेल तर एकाच जोडीदारासोबत लैगिक संबंध ठेवायला हवेत. याशिवाय सुरक्षित लैगिक संबंध ठेवायला हवेत.

- Advertisement -

निरोगी आहार –
फळे, भाज्या आणि धान्य हे व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सीडेंट्स परिपूर्ण असतात. यांच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. जे HPV सारख्या संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक आहे.

धूम्रपान करू नका –
धूम्रपान करू नका, धूम्रपान केल्याने गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर विकसित होतो. त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळायचा असेल तर धूम्रपान करणे टाळले पाहिजे.

स्ट्रेस कमी करा –
योग किंवा ध्यान यासारख्या क्टिव्हिटी करून स्ट्रेस दूर ठेवता येते. जास्त प्रमाणात स्ट्रेस असेल तर रोगप्रतिकार शक्ती कमी होते. ज्याने शरीर अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे योग्य किंवा ध्यान करणे गरजेचे आहे.

अल्कोहोलचे सेवन कमी करा –
अति प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अल्कोहोलचे सेवक करणे टाळा. या बदलांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

 

 


हेही वाचा ; स्तनपान करणाऱ्या महिलांनी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश

 

- Advertisment -

Manini