Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthगर्भधारणा मधुमेह कसा टाळाल?

गर्भधारणा मधुमेह कसा टाळाल?

Subscribe

ज्या स्त्रियांना कधीच डायबिटीज झालेला नाही, पण गर्भधारणेदरम्यान ज्यांना डायबिटीज होतो, त्याला गर्भधारणा डायबिटीज असे म्हणतात. ही समस्या आईकडून गर्भाशयात असलेल्या मुलाकडेही जाते आणि ती पालक व मूल दोघांच्याही अडचणीचे कारण बनते. मात्र, हा आजार वेळीच निदर्शनास आल्यास त्यावर उपचार शक्य आहेत.

जेव्हा तुमचे शरीर प्रेगन्सीसाठी आवश्यक असलेले सर्व इंसुलिन तयार करण्यास आणि वापरण्यास सक्षम नसते आणि ते उर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी पुरेसे इन्सुलिनशिवाय रक्त सोडू शकत नाही तेव्हा गर्भावस्थेचा डायबिटीज सुरू होतो. अशा प्रकारे, रक्तामध्ये ग्लुकोजची उच्च पातळी तयार होते, ज्याला ‘हायपरग्लाइसेमिया’ म्हणतात. सर्वात आधी गरोदरपणातील डायबिटीजची कारणे जाणून घेऊयात,

Gestational Diabetes Explained — Jefferson OB/GYN

गरोदरपणातील डायबिटीजची कारणे
1) लठ्ठपणा किंवा जास्त वजन वाढल्याने गरोदरपणातील डायबिटीज होण्याचा धोका वाढतो.
2) तुमच्या आई-वडिलांना किंवा भावंडांना या प्रकारचा डायबिटीस असेल, तर अशावेळी गरोदरपणातील डायबिटीज होण्‍याचा धोका वाढतो.
3) आधीच्या गर्भावस्थेत डायबिटीज असल्यास पुढील प्रेग्नीसीमध्ये ते पुन्हा होण्याची शक्यता अधिक असते.

गरोदरपणातील डायबिटीजमुळे गर्भ सामान्यपेक्षा मोठा होऊ शकतो आणि त्यामुळे प्रसूतीमध्ये अडचण येऊ शकते. बाळाच्या जन्मानंतर लगेचच हायपोग्लायसेमियाचा धोका देखील निर्माण होतो.

मातेला जाणवणाऱ्या समस्या –
1) गरोदरपणातील डायबिटीज असलेल्या महिलांना सिझेरियनद्वारे प्रसूती होण्याची शक्यता वाढते.
2) गरोदरपणातील डायबिटीजमुळे मातेला हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
3) गरोदरपणातील डायबिटीज ने ग्रस्त असलेल्या महिलांना प्रेगन्सीनंतर ‘टाइप 2’ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

प्रेगन्सीदरम्यान तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर बारीक लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही घराबाहेर असाल, तर तुम्ही कॉम्पॅक्ट ग्लुकोमीटर वापरू शकता जसे की स्मार्टफोन ग्लुकोमीटर. यासोबतच तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या आणि आहारतज्ञांच्या मदतीने आहाराचे सेवन करा.


हेही वाचा ; कडू मेथीचे अगणित फायदे

- Advertisment -

Manini