Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthनिरोगी आरोग्य हवयं, मग मित्र हवेच

निरोगी आरोग्य हवयं, मग मित्र हवेच

Subscribe

आपल्याला आई- वडील, नातेवाईक हे जन्माने मिळतात. पण, मैत्री ही कमवावी लागते. असे म्हणतात की, ज्याच्याकडे मैत्रीचा खजिना आहे तोच खरा श्रीमंत. मैत्री ही केवळ आपल्या आयुष्यासाठीच नाही तर आरोग्यसाठीही फायद्यची असते. एका संशोधनानुसार, कमी मित्र असलेल्या लोकांपेक्षा जास्त मित्र बनवलेल्या लोकांचे आयुष्य ७ वर्षापर्यत जास्त असते. निरोगी मैत्रीमध्ये परस्पर प्रेम आणि समंजसपण दिसून येतो.

एका चांगला मित्र तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. तुम्हाला अडचणीच्या वेळेस मदत करतो, संकटात पाठीशी उभा राहतो. पाहुयात, याच सच्च्या मैत्रीचे अनेक आरोग्यदायी फायदे,

- Advertisement -

स्ट्रेस कमी होतो –
धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच स्ट्रेस जाणवत आहे. सुरुवातीला जरी ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी दीर्घकाळाने याचे आरोग्यवर गंभीर परिणाम दिसू शकतात. स्ट्रेसमध्ये सामान्यतः चिडचिड, चिंता, नैराश्य यासारखी लक्षणे दिसून येतात. परिणामी, तुम्हाला निद्रानाश, बद्धकोष्ठता, हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी तुम्हाला मैत्री फायद्यची ठरू शकते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मजबूत मैत्रीमुळे स्ट्रेसचा सामना करायला सोप्पे जाते. मित्रांसोबत वेळ घालविल्याने आपण थोडा वेळ का होईना, सगळे टेन्शन, स्ट्रेस आपण विसरून जातो. शिवाय मित्रांशी बोलून आपले मानसिक आरोग्य उत्तम राहायला मदत मिळते.

भावनिक आधार मिळतो –
मैत्रीत भावनिक आधार मिळतो. खरे मित्र कायमच भावनिक आधार देतात. जेव्हा तुम्ही दुःखी असता, कोणत्या प्रोम्ब्लेममध्ये असता तेव्हा ते कायमच तुम्हाला भावनिक आधार देतात. खरे मित्र, तुमचे संपूर्ण म्हणणे ऐकतात, तुम्हला समजून घेतात. तुमच्या भावना ते जाणतात. परिणामी, तुम्ही तुमच्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्याने तुमची मानसिक घुसमट होत नाही तसेच तुम्हाला मानसिक अस्वस्थेतेचाही सामना करावा लागत नाही.

- Advertisement -

आपुलकीची भावना –
खरी मैत्री टिकवून ठेवल्याने आपुलकीची भावना निर्माण होते. मैत्रीत आपण मित्र- मैत्रिणींची काळजी घेतो. जेव्हा आपण मैत्रीत इतरांची काळजी घेतो, तेव्हा आपण त्यांना भावनिक आधार देण्याची जबाबदारी घेता. अशाने तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व बनता. त्यासोबत मैत्रीत सपोर्ट नेटवर्क मिळते. अशाने तुम्हाला सुरक्षित वाटू लागते. परिणामी, तुम्ही स्ट्रेसफ्री आयुष्य जगू लागता.

आव्हानांना सामोरे जाण्यास मदतीचा हात मिळतो –
आयुष्य हे चढउतारांनी व्यापलेले आहे. कोणत्याही वेळी तुम्हाला एखाद्या समस्येचा किंवा अपघाताचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे तुमचे भावनिक आरोग्य बिघडू शकते. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत असतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, तुमची मैत्री घट्ट असेल तर तुमच्यासाठी आयुष्यातील अडीअडचणींना तोंड देणे सोप्पे जाते. यासह कुटुंबाकडून होणारी उपेक्षा आणि वाईट वागणूक यांच्यावर मात करण्यासाठी मैत्री नेहेमीच फायद्याची ठरते.

एकंदरच, निरोगी आरोग्यासाठी मित्र हे हवेतच. कारण, मित्र नसणे हे दिवसातून १५ वेळा सिगरेट ओढण्याइतकेच हानिकारक ठरू शकते. जर तुमचे मित्र तुमच्यासोबत असतील तर, तुमची दीर्घायुष्याची आशा ५०% वाढते. यासह एक चांगले फ्रेंड सर्कल शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवते.

 

 


हेही वाचा : एक मिठी आणि सगळे आजार गायब..

- Advertisment -

Manini