Sunday, December 3, 2023
घरमानिनीHealthचष्मा कायमचा घालवायचा असेल, तर डायटमध्ये करा 'या' फूड्सचा समावेश

चष्मा कायमचा घालवायचा असेल, तर डायटमध्ये करा ‘या’ फूड्सचा समावेश

Subscribe

डोळेच्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुमच्या डायटमध्ये फूड्सचा समावेश करावा. यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत करते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जास्त नंबरचा चष्मा असेल, तर त्याचा नंबर कमी करण्यास देखील मदत होते. यामुळे तुम्ही तुमच्या डायटमध्ये या फूड्सचा समावेश करावा. ज्यामुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य चांगले आणि चष्म्याचा नंबर कमी होतो.

डोळ्याच्या आरोग्यासाठी ‘या’ फूड्सचे सेवन करा

मासे

 

- Advertisement -

डोळ्यांच्या आरोग्यासाठी मासे खाणे फायदेशीर असते. तुम्ही तुमच्या डायटमध्ये माशांचा समावेश करावा. यामुळे तुमच्या डोळ्यांच्या दृष्टी चांगली होण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीची डोळ्याची दृष्टी कमजोर असेल आणि ज्यांच्या डोळ्यांना चष्मा असेल अशा लोकांनी त्यांच्या डायटमध्ये माशांचा समावेश करावा.

अक्रोड

 

- Advertisement -

तुम्ही जर शाकाहारी आहात, तर तुम्ही तुमच्या डायटमध्ये अक्रोडचा समावेश करावा. अक्रोडमध्ये ऑमेगा -3 आणि व्हिटॅमिन ई असते. यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी अक्रोड खावे. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांशी संबंधित सर्व आजार कमी होतात.

आंबट फळे

डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आंबट फळे फायदेशीर असतात. कारण, आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. या फळात एटीऑक्सिडेंट असल्याने तुमचे डोळ्याचे आरोग्य खूप चांगले राहते. जर तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमजोर आहे, तर तुमच्या डायटेमध्ये आंबट फळांचा समावेश करावा. तुम्ही ऋतूनुसार आंबट फळे खावी.

पालेभाज्या

डोळ्यांच्या समस्येसाठी तुम्ही पालेभाज्या खाणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असल्याने तुमच्या डोळे निरोगी राहतात. यामुळे तुमच्या डायटेमध्ये पालेभाज्या असाव्यात.


हेही वाचा – ब्राऊन राईसचा आहारात समावेश करण्यापूर्वी त्याचे ‘हे’ फायदे आणि तोटे जाणून घ्या

- Advertisment -

Manini