Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthअपूर्ण झोपेमुळे होऊ शकतात 'हे' आजार

अपूर्ण झोपेमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार

Subscribe

दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री झोप घेणे गरजेचे असते. पण, हल्लीच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. निरोगी शरीरासाठी सकस आहारासोबत पूर्ण झोप होणेही गरजचे असते. तज्ज्ञांच्या मते, कमी किंवा अपूर्ण झोपेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. तुम्ही अनेक समस्यांनी ग्रासले जाऊ शकता. याशिवाय कमी झोपेमुळे म्हतारपणही लवकर येते.

अपूर्ण झोपेमुळे काय होते?

- Advertisement -

1. दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा पेशी दुरुस्त केल्या जातात. ज्याने दुसऱ्या दिवसासाठी आपण रिफ्रेश होऊन तयार होतो. पण, जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही. तेव्हा पेशी कायमस्वरूपी वृद्ध होऊ लागतात. परिणामी, तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवायला सुरवात होते.

2. कमी झोपेमुळे एकाग्रतेमध्ये अडचणी जाणवतात. अनेकदा मूड खराब होतो. ज्याने नैराश्य आणि चिंता सतावते. परिणामी हाय बीपीची समस्या जाणवू शकते.

- Advertisement -

3. अपूर्ण झोपेमुळे शरीरात जळजळ निर्माण होते.

4. कमी झोपेमुळे त्वचेच्या समस्या उदभवतात. सुरकुत्या, डोळ्यांखाली वर्तुळे आणि त्वचा कोरडी होण्याची समस्या निर्माण होतात.

5. झोपेच्या अभावामुळे वजन देखील वाढू शकते. तुम्ही जेव्हा बराच वेळ जागे राहता तेव्हा अस्वस्थपणा जाणवतो. अन्नाची क्रेविंग मोठ्या प्रमाणावर जाणवते. अतिरिक्त फॅट्स आणि कॅलरीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. ज्याने हृदयाशी संबंधित आणि कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवतात.

6. अपूर्ण झोपेमुळे शरीरात कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे इन्सुलिन रेझिटन्स होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे तुम्हाला डायबिटीसचा त्रास जाणवू शकतो.

डॉक्टरांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने किमान आठ तासांची झोपे घेणे गरजेचे असते. अन्यथा याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकता. प्रत्येक व्यक्तीने आठ तासांची झोप घेणे फार महत्त्वाचे आहे कारण निरोगी आरोग्यासाठी सकस आहार, व्यायाम, ध्यान-धारणा गरजेचे असतेच पण त्यासोबत पुरेशी झोपही महत्वाची आहे.

 


हेही वाचा ; आंघोळीनंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी कितपत योग्य?

- Advertisment -

Manini