Wednesday, February 28, 2024
घरमानिनीHealthआंघोळीनंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी कितपत योग्य?

आंघोळीनंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी कितपत योग्य?

Subscribe

पाणी हे जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. पण, ते कधी आणि किती प्रमाणात प्यावे हे माहित असणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. अनेक वेळा आपल्याला असे जाणवते की, आंघोळीनंतर लगेचच तहान लागते. अशावेळी आंघोळीनंतर पाणी पिणे कितपण योग्य आहे हे ठाऊक असणे गरजेचे आहे. कारण आपली ही सवय अनेक आजारांचे निमंत्रण ठरू शकते.

आंघोळीनंतर तहान का लागते?
आंघोळीनंतर तहान लागण्याचे कारण म्हणजे शरीराच्या बाह्य आणि अंतर्गत तापमानातील फरक. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर आपल्याला लगेचच तहान लागते. पण, तज्ञांच्या मते आंघोळीनंतर पाणी पिणे शरीरासाठी योग्य नाही.

- Advertisement -

आंघोळीनंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक –


तज्ञाच्या मते, आंघोळीनंतर लगेचच पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. असे केल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. आंघोळीनंतर लगेचच पाणी प्यायल्यास रक्तावर अतिरिक्त दबाव पडतो. परिणामी, रक्तदाब असंतुलित होऊ शकतो. यासह आंघोळीच्या वेळी शारीरिक हालचाली केल्याने हृदयाचे ठोके वाढतात, अशावेळी थोडा वेळ थांबूनच पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य मानण्यात आले आहे. जर तुम्ही आंघोळीनंतर लगेचच पाणी प्यायलात तर हृदयाचे ठोके अनियंत्रीत होऊ शकतात.

- Advertisement -

‘या’ क्रियानंतर लगेचच पाणी पिणे पिऊ नये –
आंघोळीव्यतिरिक्त, जेवताना आणि जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे. याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. असे केल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊन पोटाशी समस्या उद्भवू शकतात. याशिवाय उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक मानण्यात येते. व्यायाम करताना किंवा कठोर शारीरिक हालचालीनंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक मानले जाते.

 

 


हेही वाचा ; जेवण झाल्यावर फळं खाल तर आजारी पडाल

- Advertisment -

Manini