Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health जाणून घ्या...Menstrual Hygiene Day का साजरा केला जातो?

जाणून घ्या…Menstrual Hygiene Day का साजरा केला जातो?

Subscribe

मासिक पाळीच्या वेळी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असते. मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या (Women) आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. या मासिक पाळीच्या दिवसात मुली-महिलांना स्वच्छता आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी आज म्हणजे 28 मे रोज जागतिक मासिक पाळी स्वच्छाता दिन (Menstrual Hygiene Day) म्हणून साजरा केला जातो.

Menstrual Hygiene Day साजरा करण्यामागे मुली आणि महिलांना मासिक पाळीविषयी जागरूकता आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हे आहे. ज्या प्रामाणे आंघोळ करणे, दात घासणे आणि स्वच्छ कपडे घालणे यासारख्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे महत्त्वाचे असते.

- Advertisement -

मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅट्स बदला

- Advertisement -

महिला-मुलींनी मासिक पाळीदरम्यान 6-8 तासांनी सॅनिटरी पॅड्स बदलणे आवश्यक आहे. मासिक पाळीच्या दिवसांत दिवसभर एकच पॅड वापरणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. तसेच मासिक पाळीत सुगंधी पॅड वापरण्याऐवजी सुती आणि कापडी पॅड वापरण्यावर भर द्यावे.

टॅम्पॉन वापरताना काळजी घ्या

मासिक पाळीच्या वेळी टॅम्पॉन वापरत असाल, तर देखील 3 ते 4 चार तासांनी बदलणे आवश्यक आहे. कारण, तसे न केल्यास संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

‘हे’ जाणून घ्या

Menstrual Hygiene Day आजची तारखी का निवडली

महिलांची मासिक पाळी ही 28 दिवसांचे अंतर असते. यामुळेच Menstrual Hygiene Day ची तारीख निवडली आहे.

2013 मध्ये जर्मनीच्या WASH United या एनजीओ (NGO) पहिल्यांदा Menstrual Hygiene Dayची सुरुवात केली

- Advertisment -

Manini