Thursday, June 8, 2023
घर मानिनी Health मोबाईलमुळे वाढतोय बीपी आणि स्ट्रेस

मोबाईलमुळे वाढतोय बीपी आणि स्ट्रेस

Subscribe

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये फोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला आहे. प्रत्येक गोष्ट ही आता फोनच्या एका क्लिकवर आपल्याला मिळतेय. परंतु त्याचा अधिक वापर हा आरोग्यासाठी धोकादायक असतो हे काही अभ्यासातून ही समोर आले आहेत. अशातच आता आणखी एक रिसर्च याच संदर्भातील समोर आलाय. त्यामधून अशा काही गोष्टींचा खुलासा केलायं की, तुम्ही तुमचा फोन वापरणे बंद कराल. खरंतर फोनचा वापर अधिक करणे म्हणजे ब्लड प्रेशरच्या समस्येला आमंत्रण देण्यासारखे आहे. रिसर्चमध्ये असे सांगितले गेलेय की, व्यक्ती जेवढा अधिक वेळ फोनवर घालवतो त्यामुळे त्याला हायपरटेंन्शनची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते.

अशातच तुम्ही सुद्धा फोनवर खुप वेळ घालवत असाल तर आता ही सवय तुम्हाला बदलावी लागेल. रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, मोबाईल फोनवर प्रत्येक आठवड्याला ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोलल्यास हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंन्शनचा धोका उद्भवू शकतो. हा धोका १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. कारण मोबाईल फोनच्या माध्यमातून रेडियोफ्रिक्वेंसी एनर्जी बाहेर पडत असते, यामुळे ब्लड प्रेशर वाढते.

- Advertisement -

हायपरटेंन्शच्या कारणास्तव हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका ही उद्भवतो. चीनच्या सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्स यांनी असे म्हटलेय की, आज आपण जेवढा अधिक फोनचा वापर करतो तेवढाच तुमच्या हृदयावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जेवढा कमी मोबाईलचा वापर करता येईल तेवढा करा. तुमच्याकडे खुप रिकामा वेळ असेल तर आवडीच्या गोष्टी करा.


हेही वाचा- मसल्स आणि मूड दोघांसाठी बेस्ट आहे Music workout

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini