Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthपावसाळ्यातले 'हे' आहेत Healthy सूप

पावसाळ्यातले ‘हे’ आहेत Healthy सूप

Subscribe

सूप ही अशी गोष्ट आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची भूक कधीही मिटवू शकता. पावसाळ्यात सारखं तेलकट,तूपट आणि तिखट खाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. तसेच सकाळचा नाश्ता केल्यानंतर मधल्या वेळेत लागणारी भूक मिटवण्यासाठी काही जण चहा, कॉफी, फास्ट फूड किंवा एखाद्या पाकिटबंद खाद्यपदार्थाचे सेवन करतात. पण हा पर्याय आरोग्यासाठी पौष्टिक नाही. याऐवजी तुम्ही घरच्या घरी हेल्दी सूप तयार करून पिऊ शकता. कमीत कमी वेळात तयार होणाऱ्या काही सूप रेसिपींची माहिती आपण पाहणार आहोत. अशातच डॉक्टर देखील आपल्याला घरगुती सूप पिण्याचा नेहमी सल्ला देतात.

कारण घरगुती सूपद्वारे शरीराला जास्त प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. आहारामध्ये कोणत्या प्रकारच्या सूप रेसिपीचा समावेश करावा, याबाबत आहारतज्ज्ञांकडून माहिती घ्यावी. आरोग्यास पोषक असणाऱ्या तीन सूप रेसिपीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

- Advertisement -

Nourishing Veg Soup Recipes for a Blissful Monsoon - Junktion18

1.​बीट सूप

बीटरूट सूप रेसिपी तयार करण्यासाठी टोमॅटो, बटाटा, कांदा, लसूण, काळी मिरीची पावडर आणि लिंबू रस या सामग्रीचा उपयोग केला जातो. हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी पोषक आहेत. बिटाच्या सेवनामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते. बीटमधील घटक आपल्या त्वचेसाठीही पोषक आहेत. यातील औषधी गुणधर्मामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. बीटमध्ये अँटी ऑक्सिडंट्सचा साठा आहे.

- Advertisement -
-असा बनवा
 • बिटाचे सूप तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये बारीक कापलेला कांदा आणि लसूण फ्राय करून घ्यावा.
 • यानंतर कापलेले बीट, बटाटा आणि टोमॅटो देखील परतून घ्यावा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने शिजण्यासाठी पॅनवर झाकण ठेवावा.
 • कुकरमध्ये सूप तयार करणार असाल तर चार शिट्या झाल्यानंतर त्यावरील झाकण काढावे.

2.मिक्स व्हेजिटेबल सूप

हंगामानुसार आपण मिक्स व्हेजिटेबल सूप तयार करू शकता. यासाठी आपली आवडती भाजी पाण्यात शिजवून घ्या. सूपसाठी शिमला मिरची, सोयाबीन, मशरूम, हिरवा कांदा आणि बटाटा बारीक चिरून वेगळ्या पॅनमध्ये उकळत ठेवा.

-असा बनवा
 • मिक्स व्हेजिटेबल सूप करताना ही सर्व सामग्री नीट उकडून घ्या. आणि मग हवी तशी त्यांना फोडणी द्या.
 • यामध्ये चवीनुसार काळे मीठ, जिरे पावडर इत्यादी आवश्यक पदार्थांचा समावेश करावा.
 • सूप घट्ट होण्यासाठी काही जण सामग्रीमध्ये कॉर्नफ्लोर मिक्स करतात.
 • पण अधिक प्रमाणात याचा वापर करणं टाळावे.

3.मुगाचा शोरबा

मुगाचा शोरबा हा शरीराला अत्यंत पोषक असून हा पदार्थ लगेच होणारा आहे. तसेच लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत हा पदार्थ सगळेजण खाऊ शकतात. तसेच हा बनवण्यासाठी जास्त सामग्रीची गरज नसते. फक्त मुगाची डाळ उकडून हे केले जाते.

-असा बनवा
 • मूग स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्या.
 • तीन ते चार शिट्या होऊ द्याव्यात. मुगाचा शोरबासाठी पाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे आणि गॅसच्या मध्यम आचेवर मूग शिजवावे.
 • आता यामध्ये कोथिंबीर, बारीक कापलेली मिरची, बारीक कापलेला कांद्याची फोडणी द्यावी.
 • मसाला म्हणून केवळ चिमूटभर हळदीचा वापर करावा.
 • थोडेसे मीठ आणि काळी मिरी मिक्स करा व गरमागरम शोरब्याचा आस्वाद घ्यावा.

हेही वाचा :

Moog Dal Halwa : पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळीचा हलवा

- Advertisment -

Manini