Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealth...मग चेंज करा सीटींग पोजिशन

…मग चेंज करा सीटींग पोजिशन

Subscribe

कोरोना काळात सर्व कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करायला सांगितले होते. यावेळी सर्व कर्मचारऱ्यांना लॅपटॉपवर (Laptop) काम करावे लागते होते. घरातून काम करण्याला Work From Home असे म्हटले गेले. 20202 पासून ते 2023 आजपर्यंत Work From Home मध्ये करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉपवर काम करावे लागते. काम करताना तुम्ही लॅपटॉप कोणत्या पोजीशनमध्ये घेऊन बसता, त्याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होतो. यामुळे तुमच्या शरीराला हानी देखील होऊ शकते.

जेव्हा तुम्हाला कळते की, घरातून काम करायचे आहे. तेव्हा तुम्ही खूप खूश होऊ जाता. तुम्ही असा विचार करात की, घरी आरामात काम करणार आहात. पण, तुम्हाला माहिती आहे का? याचे किती नुकसान आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की,Work From Home मुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

बेडवर लॅपटॉप घेऊन करणे अधिक धोकादायक

जेव्हा तुम्ही बेडवर बसून लॅपटॉप घेऊन काम करता. तेव्हा तुमचे शरीर आणि पोजीशन योग्य नसते. यामुळे तुम्हाला पाठीचे दुखणे आणि पाठीचा कणा दुखणे सुरू होते. यामुळे पुढे जाऊन तुम्हाला मोठी समस्या होऊ शकते. यामुळे तुम्हाला चालता-फिरता आणि उठताना आणि बसताना समस्या होऊ लागतात.

- Advertisement -

Work From Home मध्ये तुमच्या शरीराची हालचाल खूप कमी होते. यामुळे लोकांचे वजन वाढू लागते आणि पुढे काम करण्याच्या समस्या देखील येतात. याव्यतिरिक्त तुम्ही बेडवर जास्त वेळ बसून काम करतात आणि बेडवर जेवण खाता. यामुळे तुम्हाला कमर आणि पेटाची चरब वाढते.

तुम्ही बेडवर लॅपटॉप घेऊन काम करताना तुम्हाला सतत लोळण्याची सवय लागते. ज्यास्त करून हे सर्व त्रास हिवाळ्यात जाणवू लागतात. कारण, हिवाळ्यात थंडी जास्त असल्याने लोक हे गोधडी आणि ब्लॅकेटमध्ये असताता. हिवाळ्यात लोकांना जास्त भूक लागते. यामुळे लोक जास्त जेवण करतात. यामुळे तुम्ही आळस येतो. जे तुमच्या शरीरासाठी हानिकारण आहे.


हेही वाचा – आळस दूर करण्यासाठी जपानी लोक वापरतात ‘ही’ ट्रिक्स

- Advertisment -

Manini