भेंडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. प्रत्येकाच्या घरात भेंडी खाल्ली जाते. भेंडी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. भेंडीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, इत्यादी अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. भेंडी आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. भेंडीची आपण सहसा भाजी करतो पण खूप कमी लोकांना माहिती असेल की भेंडीचं पाणीही शरीरासाठी तितकचं फायदेशीर असते.
अशातच भेंडीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. तसेच आपण भेंडीचे पाणी पिल्याने काय फायदे होतात, त्याविषयीच जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया भेंडीचे पाणी पियाल्याने काय फायदे होतात….
- भेंडीचं पाणी पिल्याने रक्ताची कमी दूर होते. तसेच भेंडीची भाजी बनवूनही तुम्ही खाऊ शकता.
- भेंडी खाल्याने किंवा भेंडीचं पाणी पिल्याने कँसरचा धोका कमी होतो.
- भेंडीचे पाणी पिल्याने तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरला कमी करू शकता.
- भेंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलही केला जाऊ शकतो.
- Advertisement -
- भेंडीमध्ये फोलेट असते जे गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर असते.
- त्यामुळे महिलांनी गरोदरपणात त्यांच्या आहारात भेंडीचा समावेश जरूर करावा.
- भेंडी गरोदरपणात फायदेशीर ठरू शकते.
- ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांनी भेंडी जरूर खा.
- कारण भेंडी कमकुवत पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते.
हेही वाचा : सांधेदुखीने त्रस्त आहात, मग प्या हळदीचे पाणी
- Advertisement -
- Advertisement -