Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthOrange Tea Benefits :लव्हेंडर, ग्रीन टीच्या गर्दीत आता ऑरेंज टीची उडी!

Orange Tea Benefits :लव्हेंडर, ग्रीन टीच्या गर्दीत आता ऑरेंज टीची उडी!

Subscribe

लोकांच्या दिवसाची सुरूवात ज्या गोष्टीने होते तो कडक चहा. आजकाल सगळे लोक तब्बेतीच्या बाबतीत इतके जागरूक झाले आहेत, की प्रत्येकजण सल्ले, आरोग्य टीप्स देत असतो. यातही अनेक व्हरायटी आल्या आहेत. लव्हेंडर, ग्रीन टीचे फायदे तुम्ही वाचले आणि अनुभवले असतील. तर आता ऑरेंज टीचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

काही लोक चहासाठी इतके वेडे असतात की, त्यांना दुधाचा, मसालेदार चहाच प्यायचाच असतो. आजवर केवळ ऑरेंज ज्यूसचे नाव ऐकलेल्यांसाठी हे थोडं विचित्र वाटतं असेल. पण सध्या “ऑरेंज टी” ची रील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ऑरेंज टी हा चवदार आणि आरोग्यदायी असतो आणि हिवाळ्यात प्यायला जातो. आज आम्ही तुम्हाला हा चहा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा ऑरेंज टी.

- Advertisement -

साहीत्य –

1 संत्रा, 1 कप पाणी, 1 चमचे चहाची पाने, 2 चमचे साखर

- Advertisement -

असा चहा बनवा- 

सर्वप्रथम संत्र्याची साल सुरीच्या साहाय्याने मधोमध कापून घ्या.

आता एका भांड्यात पाणी ठेवा आणि त्यात सोललेली संत्री आणि साखर घालून उकळा.

आता संत्र्याची साल धरा आणि त्यात सुई किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने छिद्र करा. जे चहाच्या गाळणीसारखे काम करेल.

आता एक कप घ्या. त्यावर संत्र्याची गाळणी केलेली साल ठेवा.

आता त्या सालीमध्ये २ चमचे चहापत्ती पाने टाका.

आता उकडलेले संत्र्याचे पाणी सालीत टाका.

तुम्हाला दिसेल की या सालीतून पाणी कपमध्ये जात आहे.

सर्व चहा गाळून झाल्यावर तुम्ही तो पिऊ शकता.

तुम्ही साखरेऐवजी मध घालूनही पिऊ शकता

गरमागरम संत्र्याच्या चहाचा आनंद घ्या.

संत्राच्या सालीचे फायदे 
लिंबूवर्गीय फळांचा वरचा भाग अर्थात साल चवीला आंबट असते, कारण त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात जे फळांना कीटकांपासून सुरक्षित ठेवतात. संत्र्याप्रमाणेच, त्याच्या सालामध्येही बरेच औषधी गुणधर्म असतात. त्यात फायबर, व्हिटामिन सी आणि पॉलिफेनॉल हे घटक असतात. या व्यतिरिक्त यात प्रो-प्रोटीन, फोलेट थायमिन, व्हिटामिन बी 6 आणि कॅल्शियमचे प्रमाण देखील अधिक असते.

पाचन तंत्र सुधारते आणि इम्यूनिटी वाढते
दररोज सकाळी हा चहा प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. त्यामध्ये उपस्थित व्हिटामिन सी हा घटक चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. संत्र्याच्या सालीमध्ये पॉलिफेनोल्स भरपूर प्रमाणात असतात जे टाईप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

- Advertisment -

Manini