Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthपॅरासिटेमॉल गोळ्या लिवरसाठी हानिकारक?

पॅरासिटेमॉल गोळ्या लिवरसाठी हानिकारक?

Subscribe

आपल्यापैकी अनेकजण पॅरासिटेमॉल गोळ्या घेतात. पॅरासिटेमॉलचा वापर ताप आल्यावर किंवा पेनकिलर म्हणून केला जातो. कारण त्या फारच किंमतीत उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत पॅरासिटामोलचा डोस लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील मुलांना दिला जातो. मात्र, पॅरॅसिटेमॉलचे सेवन हानिकारक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. त्याचा थेट परिणाम लिवरवर होत असतो.

संशोधन काय सांगते ?
एका संशोधनानुसार पॅरासिटेमॉलचा लिवरच्या पेशींवर परिणाम होतो. एका अभ्यासानुसार लिवर निकामी होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पॅरासिटेमॉल.तज्ज्ञांच्या मते, पॅरासिटेमॉल हे सर्वात जास्त वापरले जाणारे औषध असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचा वापर तापावर किंवा पेनकिलर म्हणून केला जातो. हे औषध जास्त डोसमध्ये किंवा दीर्घकाळ घेतल्यास याचा लिवरला धोका निर्माण होतो.

- Advertisement -

पॅरासिटेमॉलपासून धोका कधी निर्माण होतो –
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोणतेही औषध घेण्याआधी योग्य माहिती घेण्याची गरज असते. तुम्हाला हे माहित असायला हवे, कोणत्या औषधांमध्ये किती प्रमाणात पॅरासिटेमॉल आहे. यासाठी औषधांच्या रॅपरवर असणारी माहिती तुम्ही नीट वाचायला हवी. पॅरासिटेमॉलचा ओव्हरडोज आपल्या लिव्हरला डॅमेज करू शकतो. पॅरासिटेमॉल हे शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे ओव्हरडोज झाल्यावर लगेचच डॉक्टरांशी बोलून घ्या. प्रत्यक्षात लिवरचे नुकसान पॅरासिटेमॉलमुळे होत नाही तर पॅरासिटेमॉलच्या बिघाडामुळे NAPQI मुळे होते. NAPQI लिवर ग्लुटेथिऑन कमी करते आणि त्यामुळे लिवर पेशींना नुकसान करते. हे सर्व पॅरासिटेमॉल घेतल्यानंतर रक्ताची पातळी तपासल्यानंतर हे आढळून येते.

- Advertisement -

पॅरासिटेमॉलचा डोस किती सुरक्षित आहे –
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, २४ तासात ८ पेक्षा जास्त गोळ्या घेऊ नयेत. हे औषध योग्यरीत्या आणि संभाव धोके समजून घेतल्यास ते सामान्यतः सुरक्षित असते. परिणामी लिवेर संबंधित रोगांचा धोका कमी होतो.

 

 


हेही वाचा : व्हेगन डाएट म्हणजे काय? वाचा फायदे-तोटे

- Advertisment -

Manini