Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthपेल्विक इंफ्लेमेटरी डिजीजचा फर्टिलिटीवर होतो असा परिणाम

पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीजचा फर्टिलिटीवर होतो असा परिणाम

Subscribe

पीआयडी एक आरोग्यासंबंधितची सर्वसामान्य समस्या आहे, ज्यामुळे जगभरातील महिला त्रस्त असतात. परंतु हा आजार होण्याचा धोका अशाच महिलांना असतो ज्यांचे काही सेक्शुअल पार्टनर किंवा परिवारातील एखादा पीआयडीने ग्रस्त आहेत. ही समस्या कोणत्याही वयातील महिलेला होऊ शकते. पण यामध्ये सेक्शुअल अॅक्टिव्ह तरुण महिलांमध्ये हे सर्वसामान्य आहे.

पीआयडी, वेजाइना आणि सर्विक्स मध्ये होणारे संक्रमण आहे. जे जेनिटल ट्रॅक्ट संक्रमित केल्यानंतर शरिरातील अन्य अवयवयांमध्ये पोहचते. खासकरुन रिप्रोडक्टिव्ह अवयवयांना यामुळे फार नुकसान होते. ज्यामुळे इनफर्टिलिटी आणि अन्य समस्या होतात. पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीजचा फर्टिलिटीवर नक्की काय परिणाम होतो याच बद्दल आम्ही तुम्हाला अधिक सांगणार आहोत.

- Advertisement -

पीआयडी (PID) म्हणजे काय?
पीआयडी असे एक संक्रमण आहे ज्याचा परिणाम महिलांच्या रिप्रोडक्टिव्ह अवयवावर होतो. ज्यामध्ये युट्रस, ओवरी आणि फॅलोपियन ट्युबचा समावेश आहे. फेडरेशन ऑफ ऑब्सटेट्रिक अॅन्ड गायनेकोलॉजिकल सोसाइटीज ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार भारतातील २४-३२ टक्के महिला पीआयडीने ग्रस्त आहेत. सर्वसामान्यपणे संक्रमण हे बॅक्टेरियाच्या कारणास्तव होते. याची सुरुवात वजाइनापासून होते. त्यानंतर युट्रस आणि अन्य रिप्रोडक्टिव्ह अवयवात पसरते.

- Advertisement -

पीआयडीची लक्षणं
-ओटीपोटात दुखणे
-वजाइनल डिस्चार्ज
-खुप ताप येणे
-सेक्शुअल रिलेशनशिपवेळी दुखणे
-युरिन करताना दुखणे
-वारंवार लघवी होणे
-सूज येणे
-पेल्विकमध्ये दुखणे
-फर्टिलिटीवर परिणाम

पीआयडीमुळे रिप्रोडक्टिव्ह अवयव, विशेष रुपात फॅलोपियन ट्युब्सला नुकसान पोहचते. फॅलोपियन ट्युब्स ओवरीज मधून एग्जला युट्रस पर्यंत घेऊन जातो. येथे फिमेल एग्ज आणि मेल स्पर्मचे फर्टिलाइजेशन होते. जेव्हा ट्युब्स डॅमेज होते तेव्हा प्रोसेसमध्ये समस्या येते. ज्यामुळे इनफर्टिलिटीची समस्या होऊ शकते. पीआयडीमुळे युट्रसमध्ये काही निशाण ही येऊ लागतात. ज्यामुळे फर्टिलाइज एग्जला इम्प्लांट करणे मुश्किल होते. या व्यतिरिक्त पीआयडी ओवरीजला नुकसान पोहचते. याचा परिणाम एग्ज रिलिज करण्याच्या क्षमतेसह हार्मोन प्रोडक्शनवर होतो.


हेही वाचा- PCOS उपचारानंतर पुन्हा होऊ शकतो का?

- Advertisment -

Manini