Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthथंडीत वाढतो पिरियडचा त्रास

थंडीत वाढतो पिरियडचा त्रास

Subscribe

पिरिएड्समध्ये पोटात दुखणे, क्रॅम्प्स येणे अशा समस्या सामन्यतः महिलांना जाणवतात. पण, अनेकदा थंडीचे दिवस सुरु झाले की, पिरीएड्सचा त्रास हा अधिक प्रमाणात महिलांना जाणवू लागतो. उन्हाळ्याच्या तुलनेत हा त्रास जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता अधिक असते. एका अभ्यासानुसार, दर १० पैकी ६ महिलांना थंडीच्या दिवसात हा त्रास जाणवतो. थंडीत पिरीएड्सचा त्रास अधिक जाणवण्याची कारणे –

  • हिवाळयात महिलांच्या पिरीएड्सच्या दिवसात होणाऱ्या वेदना वाढतात याचे मुख्य कारण म्हणजे थंडीच्या दिवसात अनेक महिलांना व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दिवसात अधिक त्रास होण्याचा धोका अधिक असतो.
  • उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात. यामुळे पिरीएड्सच्या दिवसात महिलांना अधिक प्रमाणात वेदना जाणवतात. म्हणून ऋतु कोणताही असो, पाणी पिणे गरजेचे आहे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो.

- Advertisement -
  • लोक इतर ऋतूच्या तुलनेत हिवाळ्यात जंक फूड, तेलकट पदार्थांचे सेवन अधिक करतात. आहारात बदल झाल्याने पिरीएड्स क्रॅम्प्स अधिक जाणवतात.
  • हिवाळ्यात ॲक्टिव्हिटी कमी होतात. खाण्यातही समतोल राहत नाही. यामुळे पिरीएड्स समतोल राहत नाही शिवाय पोटदुखी,कंबरदुखी अधिक जाणवतात.

थंडीत पिरीएड्सचा त्रास कमी करण्यासाठी उपाय –

  • औषध घ्यायचे नसेल तर गरम पाण्यात दालचिनी टाकून प्या.
  • जर जास्त प्रमाणातच वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर तुम्ही घेऊ शकता.
  • आले चोखल्याने पिरीएड्स क्रॅम्पसपासून आराम मिळतो.
  • गरम पाण्याची पिशवीने शेक घ्या. याने बराच आराम मिळेल.

 

- Advertisement -

हेही वाचा : पिरियड डेट सतत बदलतेय?

 

 

- Advertisment -

Manini